Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » संसदेच्या उपहारगृहात पंतप्रधानांनी केलं जेवण

संसदेच्या उपहारगृहात पंतप्रधानांनी केलं जेवण

modi abhiprayनवी दिल्ली, [२ मार्च] – संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी गुजरातच्या दोन खासदारांसोबत ‘लंच टाईम’ मध्ये थेट संसदेच्या उपहारगृहात धडकले. उपहारगृहात त्यांनी स्वखर्चाने व्हेज थाळी मागविली आणि तिचा आस्वाद सोबत असलेल्या खासदारांसह घेतला. त्यामुळे सर्वांनाच आश्‍चर्याचा सुखद धक्का बसला. त्याचबरोबर उपहारगृहाच्या व्हिजिटर्स बुकमध्ये ‘अन्नदाता सुखी भव’ असा अभिप्रायही आवर्जून लिहिला.
संसदेच्या उपहारगृहात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांसोबत सहभोजन केलं. इतर खासदारांना दिलं जाणारं जेवणच आपल्यालाही देण्यात यावे, वेगळं काही तयार करू नये असे मोदींनी उपहारगृहाच्या मॅनेजरला सांगितलं. जेवणात मोदींनी सरसोका साग, राजमा, वरण भात मागविलं. जेवत असताना त्यांनी टेबलवर बसलेल्या खासदारांसोबत गप्पा – गोष्टीही केल्या. साधारणपणे २५ मिनिट नरेंद्र मोदी उपहारगृहात होते. जाताना त्यांनी व्हेज थाळीचे २९ रुपयेही दिले.
सरकारी कार्यालयांना अचानक भेट देऊन तपासणी करायची नरेंद्र मोदींची सवय आता सगळ्याच अधिकार्‍यांना माहित होती. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही त्यांनी अनेक अधिकारी – कर्मचार्‍यांना ‘सरप्राइज व्हिजिट’ ने धक्का दिला होता. आज दुपारी पंतप्रधान मोदींना उपहारगृहात पाहून उपहारगृहाच्या सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला, पंतप्रधान तपासणीसाठीच आले असा विचार करून व्यवस्थापकांची तर चांगलीच तारांबळ उडाली. पण तपासणीसाठी आले नसून ते जेवायला आले आहेत हे कळल्यावर सगळ्यांनीच सुटकेचा निःश्‍वास सोडला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21032

Posted by on Mar 3 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1989 of 2453 articles)


=प्रशांत भूषण, योगेंद्र यादव राजकीय समितीतून बाहेर?, बुधवारी निर्णय= नवी दिल्ली, [२ मार्च] - ऐतिहासिक विजयासह दिल्लीत सत्तेवर येऊन एक ...

×