Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » संसदेतील उपस्थितीसाठी भाजपा खासदारांसाठी व्हीप

संसदेतील उपस्थितीसाठी भाजपा खासदारांसाठी व्हीप

sansad bhavanनवी दिल्ली, [२६ एप्रिल] – आगामी तीन दिवस संसदेत नियमितपणे उपस्थित राहण्यासाठी भाजपाने आपल्या खासदारांवर पक्षादेश (व्हीप) बजावला आहे.
भाजपा सांसदीय पक्षाच्या मंगळवारी सकाळी संसद भवनात झालेल्या बैठकीत हा व्हीप बजावण्यात आला. उत्तराखंडच्या मुद्यावरून कॉंग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने इशरत जहॉं आणि ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरण उपस्थित करत कॉंग्रेसला घेरण्याची व्यूहरचना आखली आहे. त्यामुळे आगामी दोन-तीन दिवस संसदेतील वातावरण वादळी राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सभागृहात भाजपा खासदारांची पुरेशी उपस्थिती ठेवण्यासाठी हा व्हीप बजावण्यात आला असल्याचे समजते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री मंगळवारी सकाळी झालेल्या या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी इशरत जहॉं प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. सांसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दुसर्‍या टप्प्याच्या अधिवेशनातील कामकाजाबाबत सदस्यांना माहिती दिली. चालू आठवड्यात लोकसभेत कामकाज कसे राहणार आहे, याची माहिती सांसदीय कामकाज राज्यमंत्री राजीवप्रताप रुडी यांनी दिली. राज्यसभेतील कामकाजाबाबत सांसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी माहिती दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने आयोजित केलेल्या कार्यक्रमांची तसेच घेतलेल्या विविध कल्याणकारी निर्णयांची माहिती सदस्यांनी देशातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही या बैठकीत करण्यात आले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28003

Posted by on Apr 27 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (435 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२६ एप्रिल] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत विरोधी बाकांवरील सदस्यांची विचारपूस करीत नवा पायंडा पाडला. दरम्यान, ...

×