Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » संसदेत बसलेले काही जण दहशतवादीच

संसदेत बसलेले काही जण दहशतवादीच

=प्राची साध्वी विधानावर ठाम, माफी मागण्यास नकार=

Sadhvi Prachi. Picture from her facebook account.

नवी दिल्ली, [२७ एप्रिल] – संसदेत बसलेले काही जण दहशतवादी आहेत, या आपल्या विधानावर विश्‍व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची आज बुधवारी कायम राहिल्या. राज्यसभेच्या शिस्तपालन समितीपुढे त्या हजर राहिल्या. यावेळी विरोधी सदस्यांनी त्यांना विनाअट माफी मागण्यास सांगितले असता, त्यांनी माफी मागण्यासही नकार दिला.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात साध्वी प्राची यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर आज त्या पी. जे. कुरियन यांच्या अध्यक्षतेखालील शिस्तपालन समितीपुढे हजर झाल्या होत्या.
समितीच्या बैठकीतून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, मी या देशाची कन्या आहे. मी आपल्या वक्तव्यावरून माघार घेऊ शकत नाही. माफी मागण्यासाठी माझ्यावर प्रचंड दबाव आला. मी बोलण्याचा प्रयत्न केला असता समितीतील काही सदस्यांनी मला शांत राहण्याची सूचना केली. पण, मला देखील बोलण्याचा अधिकार आहे, हे मी त्यांना ठासून सांगितले.
अशाप्रकारचे वक्तव्य करून मी संसदेचा अपमान मुळीच केला नाही. संसदेत बसलेले काही जण अतिरेकी आहेत, एवढेच मी बोलले आहे आणि या वक्तव्यावर मी ठाम असल्याने माफी मागणार नाही, असे मी स्पष्ट केले असल्याचेही त्या म्हणाल्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28030

Posted by on Apr 28 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (425 of 2453 articles)


=ममतांचा कॉंगे्रसवर हल्ला= श्रीरामपूर, [२७ एप्रिल] - शारदा चिटफंड घोटाळ्यावरून पश्‍चिम बंगाल विधानसभेत गोंधळ घालणारा कॉंगे्रस पक्ष संपुआ सरकारच्या काळात ...

×