Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » संसद अधिवेशनाचा कालावधी २ दिवस वाढणार

संसद अधिवेशनाचा कालावधी २ दिवस वाढणार

parliament porchनवी दिल्ली, [१८ मार्च] – कोळसा आणि खाण तसेच खनिज यावरील सुधारित विधेयक पारित करण्यासाठी गरज पडल्यास संसद अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातील कालावधी दोन दिवसांनी वाढविण्यात येऊ शकतो, असे स्पष्ट संकेत सरकारतर्फे आज बुधवारी देण्यात आले.
संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवार २० मार्च रोजी संपणार आहे. पण, ही विधेयकं संसदेत पारित करण्यासाठी २३ आणि २४ मार्च, असे दोन दिवस अधिवेशन वाढविले जाऊ शकते. २१ आणि २२ मार्च अर्थात शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सुट्यांचे आहेत.
संसदीय कामकाजावरील कॅबिनेट समितीची बुधवारी सकाळी बैठक झाली. हे विधेयक अतिशय महत्त्वाचे असल्याने पहिल्या टप्प्यात दोन दिवस अतिरिक्त कामकाज करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे, असे सूत्राने सांगितले. संबंधित दोन्ही विधेयकं ज्या सिलेक्ट कमिटीकडे पाठविण्यात आली आहेत, त्या समित्यांनी सुचविलेल्या दुरुस्त्या सरकारला मान्य झाल्यास ती राज्यसभेत पारित होतील, असा सरकारला विश्‍वास आहे. त्यानंतर ही विधेयकं लोकसभेत पाठविण्यात येणार आहेत. या समित्यांनी विधेयकांमध्ये कोणतेही बदल न करता आपल्या शिफारसी पाठविल्या आहेत. यामुळे कॉंगे्रस सदस्यांनी संतप्त होऊन राज्यसभेत गोंधळ घातला. या गोंधळात सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21559

Posted by on Mar 19 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1883 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१७ मार्च] - विकास आणि समृद्धीसाठी ऐतिहासिक संधी आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) दर आठ टक्क्यांपेक्षाही जास्त जाण्याची ...

×