Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » संसद अधिवेशनाचे सूप वाजले

संसद अधिवेशनाचे सूप वाजले

sansad1नवी दिल्ली, [१३ मे] – संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन आज बुधवारी अनिश्‍चित काळासाठी संस्थगित करण्यात आले. या अधिवेशनात दोन्ही सभागृहांच्या ३० पेक्षा जास्त बैठका झाल्या आणि अनेक महत्त्वाची विधेयके पारित करण्यात सरकारला यश आले.
गेल्या २३ फेबु्रवारी रोजी हे अधिवेशन सुरू झाले होते. रेल्वे अर्थसंकल्प आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काही आर्थिक कामकाजही करण्यात आले. २१ मार्च रोजी अधिवेशनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर २० एप्रिलपासून लोकसभेचे आणि २३ एप्रिलपासून राज्यसभेचे दुसर्‍या टप्प्यातील कामकाज सुरू झाले. जमीन अधिग्रहणावर सरकारने जारी केलेल्या अध्यादेशाची मुदत ५ एप्रिल रोजी संपल्याने सरकारने पुन्हा नवा अध्यादेश जारी केला होता. त्यासाठी राज्यसभेचे कामकाज संस्थगित करण्यात आले होते. सदस्यांना नोटीस देण्यासाठी किमान १५ दिवसांचा वेळ मिळावा, यासाठी हे अधिवेशन २३ एप्रिलपासून बोलावण्यात आले होते.
हे अधिवेशन फलदायी ठरले, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. या अधिवेशनात जनतेशी संबंधित अनेक महत्त्वाची कामे करण्यात आली, असे ते म्हणाले. तर, राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी, या अधिवेशनात सदस्यांच्या व्यक्तिगत व्यवहारात आपल्याला बराच सकारात्मक बदल जाणवल्याचे मत व्यक्त केले. तातडीच्या मुद्यांवर चांगली चर्चा झाली, असेही ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22543

Posted by on May 14 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1697 of 2453 articles)


=एसआयटीचा तिसरा धक्कादायक अहवाल= नवी दिल्ली, [१३ मे] - क्रिकेट सामन्यांवर लावण्यात येणारा सट्टा हाच देशातील काळ्या पैशाची निर्मिती करणारा ...

×