Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सचिन ‘स्कील इंडिया’ कॅम्पनेचा ब्रँड अँम्बेसेडर

सचिन ‘स्कील इंडिया’ कॅम्पनेचा ब्रँड अँम्बेसेडर

sachin-tendulkar1नवी दिल्ली, [९ एप्रिल] – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सरकारने ‘स्कील इंडिया’ (कौशल्य विकास) योजनेचा ब्रँड अँम्बेसेडर बनवले आहे. सचिन तेंडुलकर हा तरूणांचा आदर्शस्थान आहे, त्यांच्या गळ्यातील ताईत आहे. जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचता यावे तसे कौशल्य विकासाप्रती तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करता यावी यासाठीच सरकारने सचिनला ‘स्कील इंडिया’ या कॅम्पेनचा चेहरा बनविण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र शासनाने देशात कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे, तसेच तरुणांनी आपल्या पायावर उभे राहावे यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार २०२२ पर्यंत देशातील ४० कोटींहून अधिक तरुणांना कुशल बनविण्याचे लक्ष्य मंत्रालयासमोर आहे. यामुळे रोजगारनिर्मितीचे प्रमाण वाढेल.
कौशल्य विकास विभागाचे मंत्री राजीवप्रताप रूडी यांच्यानुसार, कौशल्य विकासासाठी आदर निर्माण करणे गरजेचे असून या कॅम्पेनद्वारे हाच विचार मांडण्यात आला आहे. हे कॅम्पेन समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच कुशल भारत बनविण्याच्या लक्ष्यातील एक महत्वपूर्ण पाऊल आहे. सचिन हा जगाचा आदर्श आहे. त्याच्यातील कौशल्याने त्याने क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवल व अनेक पिढ्यांसाठी तो आदर्श बनला, असेही रूढी यांनी सांगितले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27775

Posted by on Apr 9 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (502 of 2453 articles)


मुंबई, [९ एप्रिल] - २६/११ चा मुंबई दहशतवादी हल्ल्याविरोधात लढा देण्यात मोलाची कामगिरी बजावणार्‍या ‘मॅक्स’या श्‍वानाचा शुक्रवारी संध्याकाळी मृत्यू झाला. ...

×