Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » सपा सर्व २४३ जागा लढविणार

सपा सर्व २४३ जागा लढविणार

Mulayam-Singh-Yadav_1पाटणा, [७ सप्टेंबर] – जागावाटपाच्या मुद्यावर नाराज होऊन जनता परिवारातून बाहेर पडलेल्या समाजवादी पार्टीने बिहार विधानसभेच्या सर्व २४३ जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
बिहार सपाचे अध्यक्ष रामचंद्र सिंह यादव यांनी आज सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. जनता परिवाराचा घटक असलेल्या सपाला जदयु आणि राजदने अवघ्या पाच जागा दिल्या. हा आमचा अपमान असल्यानेच आम्ही जनता परिवारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सपाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. आपण बिहारमध्ये सर्वच जागा लढवायला हव्या, असा प्रस्ताव मी त्यांना सादर केला आणि त्यांनी लगेेच होकारही दिला, असे त्यांनी सांगितले.
आम्ही चांगल्या उमेदवारांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पहिली यादी तयार करून ती पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठविण्यात येईल. पक्षाच्या मंजुरीनंतरच ती जाहीर केली जाईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, सहा डाव्या पक्षांनी बिहारमध्ये मोठी आघाडी स्थापन केली आहे. भाजपाप्रणीत रालोआ आणि जदयु-राजदचा समावेश असलेल्या महाआघाडीचा पराभव करणे हाच आमचा एकमेव उद्देश असल्याचे डाव्या नेत्यांनी सांगितले. या आघाडीत माकप, भाकप, भापक (एमएल), सोशॅलिस्ट युनायटेड सेंटर ऑफ इंडिया, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक आणि आरएसपी या पक्षांचा समावेश आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23727

Posted by on Sep 9 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1497 of 2452 articles)


मोदी सरकारची ऐतिहासिक आश्‍वासनपूर्ती समान पद, समान कार्यकाळ, समान पेन्शन तिजोरीवर पडणार दहा हजार कोटींचा भार एक सदस्यीय न्यायालयीन ...

×