Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » समाजाच्या हितासाठी गोहत्या टाळाच

समाजाच्या हितासाठी गोहत्या टाळाच

=दक्षिणेतील मौलवींचे आवाहन=
COW AND CALFहैदराबाद, [१८ सप्टेंबर] – काही राज्यांमध्ये गोहत्येवर घालण्यात आलेली बंदी आणि त्यातच मुस्लिमांचा ईद-उल-अझा हा सण अवघ्या सात दिवसांवर आला असल्याने देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत असतानाच, दक्षिण भारतातील काही मौलवींनी, समाजाच्या व्यापक हितासाठी गाय व बैलांचा बळी देण्याची प्रथा थांबवा, असे आवाहन केले आहे.
वर्तमान स्थितीत मुस्लिम समाजानेही आपला मोठेपणा दाखवायला हवा आणि गाईंची कत्तल करण्याची जुनाट प्रथा बंद करून इस्लामध्ये परवानगी असलेल्या जनावरांचीच कत्तल करावी. यामुळे कुणाच्याही भावना दुखावणार नाही आणि देशातही शांतता कायम राहण्यास मदत मिळेल. ‘दावत-ए-दीन’ या शब्दाचा खरा अर्थ गरीब आणि गरजूंना पोटभर अन्न द्या, असा होतो, असे मौलवींच्या या गटाने स्पष्ट केले आहे.
मौलवींच्या या विचारांना बहुतांश मुस्लिम शाळांनीही पाठिंबा दिला आहे. गोहत्या थांबविण्यात यावी, यासाठी सोशल मीडिया, बैठका आणि शुक्रवारच्या एकत्रित नमाजातून प्रचार करण्यात यावा, असेही त्यांनी म्हटले आहे. मुस्लिमांनी कायदा हातात घेऊ नये आणि गोहत्येपासून स्वत:ला दूर ठेवावे. यामुळे इस्लामची खरी शिकवण इतरांनाही मिळेल, असे या मोहिमेचे नेतृत्व करणारे इस्लामिक विचारवंत सईद हुसेन मदानी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
गाय हिंदू धर्मासाठी वंदनीय आहे. आपण जेव्हा तिची कत्तल करतो, तेव्हा हिंदूंच्या भावना दुखावतात. यातून होणार्‍या उद्रेकात हिंसाचार घडून येतो. प्राणहानीसोबतच संपत्तीची हानीही होते. देशात अस्थिरता निर्माण होते. ही स्थिती टाळण्यासाठी मुस्लिमांनीही गाईंची कत्तल करण्याची प्रथा बंद करायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23882

Posted by on Sep 19 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1453 of 2453 articles)


महापालिकेवर पैसे खाण्याचा आरोप जंग यांच्या निर्देशांवर पंतप्रधानांना लिहिले पत्र नवी दिल्ली, [१८ सप्टेंबर] - राजधानी दिल्लीला डेंग्यू या ...

×