|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:07 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.61° C

कमाल तापमान : 30.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 55 %

वायू वेग : 5.32 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.99° C

Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28.23°C - 31.22°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.91°C - 30.32°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.33°C - 30.31°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.26°C - 30.1°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

26.95°C - 30.15°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.31°C - 30.25°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » समीर भुजबळांची एसीबीकडून चौकशी

समीर भुजबळांची एसीबीकडून चौकशी

  • महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा
  • छगन भुजबळांसह पंकजचीही होणार चौकशी

Chagan-Bhujbal2मुंबई, [२० फेब्रुवारी] – नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीला सुरूवात केली असून, पहिल्याच दिवशी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांची कसून चौकशी करण्यात आली. तर, खुद्द छगन भुजबळ आणि त्यांचे पुत्र पंकज यांची सोमवारी चौकशी होणार असल्याचे वृत्त आहे.
भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र सदन भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करण्यासाठी परवानगीचा प्रस्ताव राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्य सरकारला दिला होता. या प्रस्तावाला डिसेंबर २०१४ मध्ये राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवल्यानंतर या चौकशीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. त्याअनुषंंगाने सदर चौकशी करण्यात आली.
समीर भुजबळ संचालक असलेल्या कंपन्यांबाबतची चौकशी करण्यासाठी गेल्या आठवड्यात त्यांना एसीबीने समन्स बजावला होता. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या चौकशीला अखेर सुरुवात केली आहे. शुक्रवारी भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांची एसीबीने तब्बल तीन तास कसून चौकशी केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एसीबीने तब्बल १५० मुद्यांवरील विविध प्रश्‍नांची एक प्रश्‍नावली तयार केली आहे. समीर भुजबळ संचालक असलेल्या कंपन्यांशी संबंधित असलेल्यांना या प्रश्‍नावलीतील १६ प्रश्‍न विचारण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात छगन भुजबळ यांच्या पत्नी मीना, समीर यांच्या पत्नी शेफाली, पंकज भुजबळांच्या पत्नी विशाखा यांच्यासह सत्यवान केसकर, तनवीर शेख, इम्रान शेख, संजय जोशी, गीता जोशी आणि निमिष बेंद्रे यांचीही चौकशी केली जाणार आहे. समीर भुजबळ यांना पुन्हा सोमवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

Posted by : | on : 21 Feb 2015
Filed under : ठळक बातम्या, महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g