Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » समुद्राची ताकद जाणणारेच महासत्ता बनतात: पर्रीकर

समुद्राची ताकद जाणणारेच महासत्ता बनतात: पर्रीकर

parrikar_manohar3पणजी, [२८ मार्च] – ज्यांना समुद्राची ताकद माहिती आहे, असेच देश महासत्ता बनतात आणि भारतालाही महासत्ता बनायचे आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येथे केले. दिवाडी येथील एक्केरियस शिपयार्ड प्रा. लि. तर्फे नवीन बोटीच्या बांधकामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला तेव्हा ते बोलत होते.
समुद्राचे आव्हान पेलण्यासाठी सिद्ध झालेल्या व भारत परिक्रमेवर जाण्यासाठी सज्ज असलेल्या सहा महिला कमांडण्टचे आपण अभिनंदन करीत असल्याचे ते म्हणाले. महिला आणि पुरुष यांच्यामध्ये आपण फरक करीत नाही. एवढेच नव्हे तर नवीन विक्रमासाठीही आपण त्यांना शुभेच्छा देत असल्याचे ते म्हणाले. दोनवेळा भारत परिक्रमा पूर्ण केलेल्या म्हादई या बोटीच्या यशस्वी बांधकामानंतर आता एक्केरियस शिपयार्डतर्फे नवीन बोटीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. त्या बोटीच्या बांधकामाचा शुभारंभ पर्रीकर यांच्या हस्ते नारळ फोडून झाला.
शिपयार्डचे व्यवस्थापक रत्नाकर दांडेकर यांचेही त्यांनी अभिनंदन केले. आत्मविश्‍वास हा महत्त्वाचा असतो आणि नव्याने सागर परिक्रमेवर जाणार्‍या सहा महिला कमांडण्टचे त्यासाठी कौतुक व्हायला हवे. नव्याने तयार होणारी बोट एक वर्षाच्या कालावधीत पूर्ण होणार आहे. त्यानंतर ही बोट सागर परिक्रमेसाठी जाणार आहे. तत्पूर्वी, सहा महिलांची टीम मॉरिशसला जाणार आहे. त्यासाठी त्यांना पर्रीकर यांनी शुभेच्छा दिल्या.
भारत सरकारने मेक इन इंडिया आणि नारी शक्तीचा नारा चालविला आहे. पण एक्केरियस शिपयार्डने २००८ मध्येच मेक इन इंडियाचा नारा लावला. म्हादई बोटीची यशस्वी बांधणी करून मेक इन इंडिया सिद्ध करून दाखविले. या बोटीने दोन वेळा सागर परिक्रमा केली. आता तिसर्‍यांदा सागर परिक्रमेसाठी ही बोट सज्ज आहे.
महिला कमांडण्टची सागर परिक्रमा
यावेळी सहा महिला कमांडण्ट सागर परिक्रमा करणार आहेत. त्यासाठी त्यांना प्रशिक्षणही दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्तीची हाक दिली आहे. आयएनएस मांडवीमध्ये त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना सागर परिक्रमेवर पाठविण्यात येणार आहे. त्यासाठीच या नवीन बोटीचे बांधकाम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27628

Posted by on Mar 29 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (553 of 2453 articles)


=मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साधला जिल्ह्याधिकार्‍यांशी संवाद= मुंबई, [२८ मार्च] - राज्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांमधून शेततळ्याच्या मागणीसाठी सुमारे ७० हजार ...

×