Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » समृद्धीची वाट अडवू नका : जेटली

समृद्धीची वाट अडवू नका : जेटली

Arun-Jaitley3नवी दिल्ली, [१७ मार्च] – विकास आणि समृद्धीसाठी ऐतिहासिक संधी आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) दर आठ टक्क्यांपेक्षाही जास्त जाण्याची अपेक्षा असताना विरोधी पक्षांनी अडवणुकीचे धोरण स्वीकारून प्रगतीचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज मंगळवारी लोकसभेत केले.
सरकारने सर्वसाधारण अर्थसंकल्पात कंपनी कर ३० टक्क्यांवरून २५ टक्के केला असल्याने हे सरकार श्रीमंतांचाच विचार करते, असा अर्थ यातून कोणीही काढू नये, असे स्पष्ट करताना, संपुआ सरकारच्या काळात अर्थमंत्री असलेले पी. चिदम्बरम् यांनी सादर केलेल्या प्रत्यक्ष कर संहितेतूनच आपण ही कल्पना घेतली आहे, असा प्रहार जेटली यांनी केला.
थेट विदेशी गुंतवणुकीसाठी देशातील जास्तीतजास्त क्षेत्रे खुली करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले. रोजगाराच्या संधी उपलब्ध करूण देणे, पायाभूत क्षेत्राचा विकास करण्यासाठी आणि सामाजिक कल्याणाचे कार्यक्रम धडाक्यात राबविण्यासाठी जास्तीतजास्त निधीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
आज देशाच्या प्रगती आणि समृद्धीसाठी खरोखरच एक ऐतिहासिक संधी चालून आलेली आहे. जगाच्या दृष्टीनेही भारत उच्चस्थानी पोहोचला आहे. आपण या संधीचा फायदा घ्यायलाच हवा. जागतिक अर्थव्यवस्थाही भारतासाठी अनुकूल आहे, असे जेटली यांनी विनियोजन विधेयकावरील चर्चेत सांगितले. यानंतर हे विधेयक आवाजी मतदानाने पारित करण्यात आले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21552

Posted by on Mar 18 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1884 of 2453 articles)


=भर बैठकीत केले उभे= नवी दिल्ली, [१७ मार्च] - भूमी अधिग्रहण विधेयकावर लोकसभेत मतदान होणार असल्याने सर्व खासदारांसाठी व्हिप जारी ...

×