Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सरकारी कर्मचार्‍यांनी शुक्रवारी घालावे खादीचे कपडे

सरकारी कर्मचार्‍यांनी शुक्रवारी घालावे खादीचे कपडे

khadi-fabrics3नवी दिल्ली, [९ मार्च] – दर शुक्रवारी प्रत्येक सरकारी कर्मचारी आता खादी कपड्यांमध्ये दिसण्याची शक्यता वर्तविली आहे. देशातील खादी उद्योगाला चालना मिळावी यासाठी केंद्रीय कर्मचार्‍यांनी दर शुक्रवारी कार्यालयामध्ये येताना खादीचे कपडे घालावेत असा प्रस्ताव आणण्याचा विचार सरकार करत आहे. मात्र याबाबत कर्मचार्‍यांवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नसणार आहे.
देशात खादी उद्योगावर ३५ लाखाहून अधिक कामगारांचं पोट चालतं. त्यामुळे प्रत्येकाने जरी खादीचा एक कपडा खरेदी केला तरी विक्रीत नक्की वाढ होऊन या उद्योगाला चालना मिळू शकते. असे मत एका अधिकार्‍याने नोंदवलं आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने सरकारकडे केंद्रीय कर्मचार्‍यांनी आठवड्यातून एकदा तरी खादी कपडे घालावेत अशा सुचना केल्या आहे. तसा प्रस्ताव केंद्र सरकारने दिला आहे मात्र यासाठी कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नसणार आहे. दरम्यान, कर्मचार्‍यांनीही या प्रस्तावला हिरवा कंदील दिला असून एका महिला अधिकार्‍याने सांगितले की, ‘मी अनेकदा खादीची साडी घालते.’

Short URL: https://vrittabharati.in/?p=27165

Posted by on Mar 10 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (718 of 2453 articles)


बेळगाव, [९ मार्च] - संकेश्‍वर येथे शेतातील विहिरीतून गाळ काढत असताना विहिरीत तब्बल ४० बॉम्ब सापडले आहे. माजी मंत्री मल्हारीगौडा ...

×