Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » सरकारी जाहिरातींमधून राजकीय नेते हद्दपार

सरकारी जाहिरातींमधून राजकीय नेते हद्दपार

=केवळ राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीशांचीच छायाचित्रे असतील, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय=
supreme_court_1नवी दिल्ली, [१३ मे] – करदात्यांचा पैसा हा घामाचा आहे. सरकारच्या कामगिरीची जनतेला माहिती देणार्‍या केंद्राच्या जाहिरातींमध्ये राजकीय नेत्यांची छायाचित्रे लावण्यावर हा पैसा खर्च करता येणार नाही, असे स्पष्ट करताना यापुढे केंद्राच्या कोणत्याही जाहिरातीवर राजकीय नेतेच काय, तर संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांचेही छायाचित्र दिसायला नको, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी दिला. यामुळे खाबुगिरी करणार्‍या नेत्यांना मोठा झटका बसणार आहे.
केंद्र सरकारच्या जाहिरातींमध्ये केवळ राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सरन्यायाधीश यांचीच छायाचित्रे असतील. अन्य कोणत्याही नेत्यांना यात स्थान नसेल, असे न्या. रंजन गोगोई आणि न्या. एन. व्ही. रामन्ना यांच्या दोन सदस्यीय न्यायासनाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे.
सरकारी खर्चाने देण्यात येणार्‍या जाहिरातींवर खर्च होणारा पैसा करदात्यांचा आहे. त्या पैशाचा अशा प्रकारे अपव्यय व्हायला नको. कारण नसताना राजकीय नेत्यांची छायाचित्रे अशा जाहिरातींवर झळकत असल्याने सरकारच्या मुख्य धोरणांपासून जनतेचे लक्ष विचलित होऊन केवळ नेत्यांचीच वाहवा होते, असे न्यायालयाने या प्रकरणी दाखल एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना म्हटले आहे. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीच्या सहा महिने आधी सरकारी जाहिरातींवर बंदी घालण्याची याचिकाकर्त्याची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली.
राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सरन्यायाधीश ही पदे घटनात्मक असल्याने यापुढे सरकारी जाहिरातींवर केवळ त्यांचीच छायाचित्रे लावण्यात येतील. इतकेच नव्हे, तर कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव आणि चिन्हाचाही वापर यात होणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि इंटरनेट यावरील सरकारी जाहिरातींसाठी उपलब्ध केलेल्या निधीचा गैरवापर होणार नाही, यासाठी केंद्र सरकारने तीन सदस्यांची समिती गठित करावी, असे निर्देशही कोर्टाने दिले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22545

Posted by on May 14 2015. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1696 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१३ मे] - संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन आज बुधवारी अनिश्‍चित काळासाठी संस्थगित करण्यात आले. या अधिवेशनात दोन्ही सभागृहांच्या ३० ...

×