Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सरकारी योजनांच्या तक्रारी थेट मोदींच्या दरबारी

सरकारी योजनांच्या तक्रारी थेट मोदींच्या दरबारी

narendra-modi-budgetनवी दिल्ली, [२५ मार्च] – नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ या रेडिओ वरील कार्यक्रमाद्वारे लोकांशी संवाद साधला. आता नरेंद्र मोदी एक नवीन ऑनलाईन पोर्टल सुरु करणार आहेत. त्याद्वारे सरकारी योजनांविषयी जनतेच्या तक्रारी आता थेट पंतप्रधान कार्यालयात पोहचवता येणार आहेत.
या नवीन पोर्टलला ‘प्रगती’ असे नाव देण्यात आलं आहे. सरकारी योजनांविषयी जर काही तक्रार असेल, किंवा त्याच्या अंमलबजावणीत काही त्रुटी असतील तर या तक्रारी नोंदवण्यासाठी या पोर्टलवर सुविधा असेल. त्याचप्रमाणे विविध राज्यांमध्ये सरकारी योजनांची काय स्थिती आहे, याचाही लेखाजोखा या पोर्टलवर जनतेला उपलब्ध असेल. या पोर्टलवर नोंदवण्यात आलेल्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी पंतप्रधान कार्यालय स्वतः पुढाकार घेणार आहे असे सरकारी सूत्रांनी म्हटलं आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21732

Posted by on Mar 26 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1847 of 2453 articles)


=कलराज मिश्र यांचे मत, राजकीय पक्षांना सहकार्याचे आवाहन= लखनौ, [२५ मार्च] - सक्तीच्या धर्मांतरणावर आळा घालण्यासाठी देशात धर्मांतरविरोधी कायदा आवश्यक ...

×