Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » सरकारी लाभांसाठी ‘आधार’ अनिवार्य नाही

सरकारी लाभांसाठी ‘आधार’ अनिवार्य नाही

=सुप्रीम कोर्टाचा पुनरुच्चार=
aadhar-card1नवी दिल्ली, [१६ मार्च] – केवळ आधार कार्ड नाही म्हणून देशातील कोणतीही व्यक्ती सरकारी योजनांच्या आर्थिक लाभापासून वंचित राहणार नाही, या आपल्या सप्टेंबर २०१३ रोजीच्या आदेशाचे केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी काटेकोरपणे पालन करावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवारी दिला.
विविध शासकीय विभागांकडून सर्वसामान्य नागरिकांना आधार कार्डसाठी त्रास दिला जात असल्याचे न्या. चेलामेश्‍वर यांच्या नेतृत्वातील तीन सदस्यीय न्यायासनाने सरकारच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे २३ सप्टेंबर २०१३ च्या आमच्या आदेशाचे पालन होत नाही, असेच आम्हाला म्हणावे लागत आहे. आधार कार्ड नसल्याने सर्वसामान्यांना सरकारी लाभापासून वंचित ठेवले जाऊ नये, अशी आमची अपेक्षा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
सरकारच्या विविध योजनांचे लाभ आर्थिक स्वरूपात प्राप्त करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य नाही. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर मिळणार्‍या अनुदानासह अन्य सरकारी योजनांचे लाभ प्राप्त करण्याचा अधिकार या देशातील सर्व गोरगरिबांना आहे. यासाठी त्यांच्याजवळ आधार कार्ड असायलाच हवे, असे बंधन नाही. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, त्यांनाही सरकारी योजनांचे फायदे मिळायलाच हवे, असे न्यायालयाने या प्रकरणी दाखल याचिकांवर सुनावणी करताना स्पष्ट केले.
या प्रकरणी २०१३ मध्ये आम्ही जो आदेश दिला आहे, त्याचाच सरकारने पाठपुरावा करावा, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात यावे, अशी विनंती केंद्र सरकारने न्यायालयाला एका याचिकेच्या माध्यमातून केली होती. पण, सप्टेंबर २०१३ मध्ये न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21497

Posted by on Mar 17 2015. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1900 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१६ मार्च] - आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गेल्या वर्षी दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी कॉंगे्रसच्या सहा ...

×