Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » सरकार अस्थिर करण्याची होती योजना

सरकार अस्थिर करण्याची होती योजना

=अतिरेक्यांच्या चौकशीतून खुलासा=
isis2नवी दिल्ली, [२७ जानेवारी] – राजकीय नेत्यांची हत्या करून केंद्रातील भाजपाप्रणीत रालोआ सरकार अस्थिर करण्याची आमची योजना होती. हत्यासत्रांच्या माध्यमातून देशात गोंधळ निर्माण करायचा आणि भाजपा सरकारला राजीनामा देण्यास भाग पाडायचे, याच एकमेव कामगिरीवर आम्ही भारतात आलो होतो, अशी कबुली गेल्या आठवड्यात देशभरातील धाडसत्राच्या काळात अटक करण्यात आलेल्या इसिसच्या अतिरेक्यांनी दिली आहे.
या सर्व अतिरेक्यांना विशेष न्यायालयाने ५ फेबु्रवारीपर्यंत एनआयए कोठडी ठोठावल्यानंतर एनआयएचे अधिकारी त्यांची कसून चौकशी करीत आहेत. आतापर्यंतच्या चौकशीतून सरकार पाडून भारतात गोंधळाची स्थिती निर्माण करण्याची अतिरेक्यांची योजना समोर आली आहे. सरकार पाडण्यामागील तुमचा उद्देश काय होता, असे एका अधिकार्‍याने विचारले असता, भारतातही शरियत कायदा अंमलात आणण्याची इसिसची योजना आहे, असे त्यांनी सांगितले.
भारतात मुसलमानांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले. पण, दोषींना कठोर शिक्षा मिळाली नाही. केवळ शरियत कायदाच गुन्हेगारांना कठोर शिक्षा करू शकतो, यावर इसिसचा ठाम विश्‍वास आहे आणि म्हणूनच भारतातील भाजपा सरकार उलथून लावण्याची कामगिरी आमच्यावर सोपविण्यात आली होती. शरियत कायदा गुन्हेगारांचे हात, पाय तोडतो आणि त्याच्या कुटुंबातील महिला व लहान मुलांची काळजीही घेतो, असेही त्यांनी सांगितले.
भारतातील पोलिस नकारात्मक आहे आणि त्यांना आपल्या योजनेची कधीच माहिती होणार नाही, असा ठाम समजही अतिरेक्यांचा झाला होता. आमच्यावर भारतीय चित्रपटांचा प्रचंड प्रभाव आहे आणि चित्रपटांमध्ये पोलिस नेहमीच नकारात्मक भूमिकेत दाखविण्यात आले आहे, असेही या अतिरेक्यांनी म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26656

Posted by on Jan 29 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (869 of 2453 articles)


औरंगाबाद, [२७ जानेवारी] - देशात सहिष्णू-असहिष्णुतेचे वादंग पेटलेले असतानाच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी माझ्या देशासारखा सहिष्णू देश जगाच्या पाठीवर ...

×