Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » सरकार करणार मल्ल्यांच्या विमानांचा लिलाव

सरकार करणार मल्ल्यांच्या विमानांचा लिलाव

Vijay Mallyaनवी दिल्ली, [१५ मार्च] – १७ बँकांकडून घेतलेले तब्बल ९ हजार कोटी रूपयांचे कर्ज बुडविल्याचा आरोप असलेले विजय मल्ल्यांसमोरील अडचणी आता आणखी वाढत आहेत. सरकारने मल्ल्यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याची तयारी सुरू केली आहे. मल्ल्यांचं खासगी विमान एसीजे ३९९ जेट विकून व्याज आणि दंडासह ८१२ कोटी रूपयांचा सेवाकर वसूल करण्याचा सरकारचा विचार आहे.
बँकेकडून घेतलेले कर्ज वसूल करण्यासाठी आता मल्ल्यांच्या खाजगी ‘एअरबस एसीजे ३१९’ या आणि किंगफिशर एअरलाइन्सची पाच छोटी विमानं आणि तीन हेलिकॉप्टर विकण्याचा सरकारचा मानस आहे. यातून ८१२ कोटी रूपयांचा सेवा कर व दंडाची रक्कम वसूल करणार आहे.
किंगफिशर एअरलाइन्सला २०१२ मध्ये टाळं ठोकण्यात आलं होतं. त्यानंतर सेवाकर विभागानं ही विमानं जप्त केली होती. आता या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. या जेटची किंमत एमएसटीसी ही सरकारी कंपनी निश्‍चित करणार आहे.
दरम्यान, ईडीने मल्ल्या यांना ताटकळ हजर होण्याचे आदेश दिले आहेत. तसे न झाल्यास त्यांचे पासपोर्ट देखील रद्द केले जाऊ शकते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27329

Posted by on Mar 16 2016. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (656 of 2453 articles)


मुंबई, [१४ मार्च] - राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या नूतनीकरणात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज सोमवारी रात्री राज्याचे ...

×