Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सरसंघचालकांचे आक्षेपार्ह छायाचित्र, दोघांना अटक

सरसंघचालकांचे आक्षेपार्ह छायाचित्र, दोघांना अटक

DR MOHAN BHAGWATखरगोन (मध्यप्रदेश), [१८ मार्च] – रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे आक्षेपार्ह छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड करणार्‍या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे.
शकीर आणि वसीम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, त्यांनी गेल्या १६ मार्च रोजी डॉ. भागवत यांचे आक्षेपार्ह छायाचित्र सोशल मीडियाच्या एका स्थानिक समुहावर पोस्ट केले होते. तेव्हापासूनच पोलिस आरोपींचा शोध घेत होते. अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंतरसिंह कनेश यांनी दिली. डॉ. भागवत यांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रा. स्व. संघ आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली होती. पोलिसांनी या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले. यावेळी न्या. सदाशिव दागोडे यांनी त्यांना ३० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27439

Posted by on Mar 19 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (620 of 2453 articles)


=जम्मू-काश्मिरातील पेच= नवी दिल्ली, [१८ मार्च] - जम्मू-काश्मिरात सरकार स्थापन करण्याच्या मुद्यावर पीडीपी आणि भाजपा यांच्यात सुरू असलेल्या चर्चेतून अद्याप ...

×