Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सरसंघचालकांना झेड प्लस सुरक्षा

सरसंघचालकांना झेड प्लस सुरक्षा

=सीआयएसएफच्या जवानांची तैनाती=
dr mohanji bhagwat2नवी दिल्ली, [७ जून] – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली असून, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांवर सोपविण्यात आली आहे.
डॉ. मोहनजी भागवत नागपूर येथील संघ मुख्यालयात असताना आणि महाराष्ट्र व देशाच्या इतर कोणत्याही भागातील प्रवासाच्या काळात त्यांना सीआयएसएफच्या सशस्त्र जवानांचे सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. व्हीव्हीआयपींच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेता त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफच्या स्पेशल सिक्युरिटी ग्रुपकडे (एसएसजी) सोपविण्यात येते. सरसंघचालकांना असलेला धोका लक्षात घेता त्यांच्या सुरक्षेसाठी प्रशिक्षित जवानांची तैनाती आवश्यक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आणि त्याप्रमाणे ही सुरक्षा प्रदान करण्यात आली, असेही या अधिकार्‍याने सांगितले. आतापर्यंत सरसंघचालकांच्या सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र पोलिस आणि त्यांच्या सशस्त्र राखीव युनिटकडे होती.
यापुढे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या सुरक्षेसाठी ६० कमांडो चोवीस तास तैनात असतील. सीआयएसएफच्या या व्हीव्हीआयपी कमांडो तुकडीकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र आहेत. डॉ. मोहनजी भागवत यांच्या निवासस्थानाची सुरक्षादेखील हे जवान लवकरच आपल्याकडे घेणार आहेत. याशिवाय त्यांच्या ताफ्यातील वाहनेही झेड प्लस सुरक्षेच्या निकषांनुसार बदलण्यात येणार आहेत, असे सूत्राने याबाबत माहिती देताना सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22733

Posted by on Jun 8 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1653 of 2453 articles)


=बांगलादेशातील प्रसार माध्यमांची स्तुतिसुमने= ढाका, [७ जून] - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा बांगलादेश दौरा म्हणजे नव्या युगाचा ...

×