Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?

surgical-strike-storyसर्जिकल स्ट्राईक म्हणजे अतिशय ठरवून आणि नेमकेपणाने केलेली लष्करी कारवाई होय. या कारवाईमध्ये जे लक्ष्य अर्थात टार्गेट असते त्यांच्यावरच थेट हल्ला केला जातो. आजूबाजूच्या कोणालाही या हल्ल्यामुळे नुकसान पोहचणार नाही याची काळजी यामध्ये घेतली जाते. भारतीय लष्कराने बुधवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळांना लक्ष्य करताना हीच सर्जिकल स्ट्राईकची पद्धत अवलंबली.
‘सर्जिकल स्ट्राईक’ ही युद्धशास्त्रातील एक संज्ञा आहे. सर्जिकल स्ट्राईकमध्ये निष्णात सर्जन ज्या पद्धतीने शस्त्रक्रिया करताना नेमक्या ठिकाणची शस्त्रक्रिया करतो, त्याचप्रमाणे आपल्याला अपेक्षित असलेल्या ठिकाणी नेमकी तशीच परिणामकारक आणि अचूक शस्त्र कारवाई म्हणजे सर्जिकल स्ट्राईक.
थोडक्यात सर्जिकल स्ट्राईक म्हणजेच अतिशय नेमकेपणाने केलेली लष्करी कारवाईच असते. सोप्या भाषेत सांगायचे तर आत घुसून नेमक्या लक्ष्यावर हल्ला चढविणे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्जिकल स्ट्राईकमध्ये मोठे नुकसान टाळण्यावर भर दिला जातो. आपल्याला अपेक्षित ठिकाणावरच नेमका हल्ला करणे म्हणजेच सर्जिकल स्ट्राईक होय.
साधारणपणे विमानांद्वारे करण्यात येणार्‍या बॉम्बहल्ल्यात अपेक्षित ठिकाणांपेक्षा आजूबाजूच्या परिसराचीही मोठी हानी होते. हेच लक्षात घेऊन भारताने बुधवारी रात्री सर्जिकल स्ट्राईक करून पाकपुरस्कृत दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून टाकले आणि एक नवीन इतिहास रचला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29335

Posted by on Sep 30 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (87 of 2453 articles)


=संरक्षण तज्ज्ञांची प्रतिक्रिया= नवी दिल्ली, [२९ सप्टेंबर] - भारताने बुधवारी गुलाम काश्मिरात केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’चे संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी पूर्णपणे समर्थन ...

×