Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » सर्व राज्यांमध्ये समान गोहत्या बंदी कायदा

सर्व राज्यांमध्ये समान गोहत्या बंदी कायदा

=केंद्राने मागितले विधि मंत्रालयाचे मत=
sansad top three lionsनवी दिल्ली, [८ मार्च] – काही राज्यांनी स्वत:चा गोहत्या बंदी कायदा तयार केला आहे. देशातील सर्वच राज्यांमध्ये एकसारखाच कायदा असावा, यासाठी या कायद्याचे परिपत्रक इतर राज्यांना पाठविता येऊ शकते काय, यावर केंद्र सरकारने विधि मंत्रालयाचे मत मागितले आहे.
गाय आणि दूध देणार्‍या अन्य जनावरांची हत्या करण्यावर बंदी घालण्याची तरतूद आपल्या राज्यघटनेतही आहे, याकडे पंतप्रधान कार्यालयाने विधि मंत्रालयाचे लक्ष वेधले आहे. ‘‘घटनेच्या कलम ४८ मध्ये असे नमूद आहे की, राज्यांनी कृषी आणि पशुसंवर्धन आधुनिक पातळीवर करायलाच हवे. दूध देणार्‍या जनावरांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या हत्येवर बंदी घालायलाच हवी.’’
याच अनुषंगाने काही राज्यांनी गोहत्येवर बंदी घालणारा जो कायदा तयार केला आहे, तोच आदर्श कायदा म्हणून अंमलात आणण्यात यावा, यासाठी या कायद्याचे परिपत्रक इतर राज्यांनाही पाठविता येऊ शकते काय, अशी विचारणा सरकारने विधि मंत्रालयाला केली असून, शक्य तितक्या लवकर मत सादर करण्यास सांगितले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21201

Posted by on Mar 9 2015. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1952 of 2453 articles)


=तीन आठवड्यांचे कामकाज ठरले= मुंबई, [८ मार्च] - राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला सोमवार, ९ मार्चपासून प्रारंभ होत आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी ...

×