Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » सलग सहा दिवस बँक बंद

सलग सहा दिवस बँक बंद

Bank closed_strikeमुंबई, [१९ जानेवारी] – देशातील बँक कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या दहाव्या द्विपक्षीय करारासाठी इंडियन बँक असोसिएशनसोबत आज अंतिम बैठक होणार असून यात वाटाघाटी निष्फळ झाल्यास येत्या २१ ते २४ जानेवारी चार दिवस संपाचा इशारा बँक कर्मचारी संघटनेनं दिला आहे.
२१ ते २४ जानेवारी यादरम्यान बँकेचा संप असणार आहे तर त्यानंतर २५ जानेवारीला रविवार आणि सोमवारी २६ जानेवारीची सुटी आल्यामुळे सलग सहा दिवस बँक बंद राहणार आहे. याचा फटका मात्र ग्राहकांना बसणार आहे. सुमारे १० लाख कर्मचारी संपात सहभागी होणार असल्यानं देशातील बँकिंग व्यवहार पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन वर्षात संघटनेनं पाच वेळा संप पुकारला होता. हा आंदोलनाचा तिसरा टप्पा आहे. या संपामध्ये स्टेट बँक आणि स्टेट बँक समूहातील ५ सरकारी बँका, १८ राष्ट्रीयकृत बँका, आयडीबीआय, कर्नाटक बँक, फे डरल बँक, १८ जुन्या खाजगी बँका, स्टॅडर्ट चार्टर्ड बँक, एचएसबीसी, सीटी बँक आणि ८ विदेशी बँकांमधील शाखा या संपात सामील होणार असल्याचे संघटनेनं सांगितले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19814

Posted by on Jan 20 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (2210 of 2452 articles)


=राजनाथसिंह यांचे प्रतिपादन= लखनौ, [१९ जानेवारी] - भविष्यशास्त्र, विज्ञान आणि गणितात आपल्या पूर्वजांनी दिलेले योगदान अभूतपूर्व आणि अत्यंत मौल्यवान आहे. ...

×