Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » सहकारी बँकांच्या दोषी संचालकांना निवडणूक बंदी

सहकारी बँकांच्या दोषी संचालकांना निवडणूक बंदी

  • सहकार सुधारणा विधेयकाला विधानसभेची मंजुरी
  • राज्य सहकारी बँकेसह अनेक जिल्हा बँकांचा समावेश

Vidhan Bhavan_Maharashtra_assemblyमुंबई, [१५ मार्च] – अनियमित कामकाजामुळे सहकारी बँका अडचणीत येण्यास कारणीभूत ठरलेल्या संचालक मंडळास दहा वर्षे कोणत्याही सहकारी बँकेची निवडणूक लढविण्यावर बंदी घालणार्‍या सहकार सुधारणा विधेयकाला सोमवारी विधानसभेने एकमताने मंजुरी दिली.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अटकेवरून विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज प्रभावित झाले. मात्र, विरोधकांनी कामकाजावर दिवसभरासाठी बहिष्कार घातल्यानंतर कामकाज सुरळीत चालले.
विधान परिषदेत सत्तारूढ युतीचे संख्याबळ कमी असल्याने तिथे हे विधेयक पारित करून घेण्यासाठी सरकारला कसरत करावी लागणार आहे, हे विशेष!
राज्यातील सहकारी क्षेत्रात कॉंग्रेस, राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता आहे. या माध्यमातून आघाडीचे नेते राज्यातील राजकारणाला सातत्याने कलाटणी देत आले आहेत. दरम्यानच्या काळात आर्थिक अनियमितता आणि बेशिस्तीमुळे राज्यातील अनेक सहकारी बँका दिवाळखोरीत गेल्या आहेत. संचालकांच्या मनमानी कारभाराचा मोठा फटका अनेक बँकांना बसला आहे.
राज्यातील सहकारी बँकांची शिखर संस्था असलेली राज्य सहकारी बँकही याला अपवाद नाही. राज्य बँकेसह, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, नाशिक या जिल्हा सहकारी बँकाही अडचणीत आल्या आहेत, त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सहकारी कायद्यानुसार बँकांमधील आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी सुरू आहे. राज्य सरकारने यापूर्वीच यासंबधीचा अध्यादेश जारी करून कारवाई सुरू केली होती. सामवारी विधानसभेने या विधेयकाला मंजुरी दिली.
राजकीय नेते पदाचा गैरवापर करून सहकारी बँकांना आर्थिक दिवाळखोरीत आणतात. अशा भ्रष्ट संचालक मंडळावर बरखास्तीची कारवाई होते. पुढे हेच संचालक, मंडळ निवडणुकीत विजयी होतात. याचा परिणाम बँकेच्या कर्जवसुलीवर होतो. तसेच न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावाही होत नाही. या सर्वांचा परिणाम होऊन ठेवीदारांमध्येही विपरित संदेश जातो, त्यामुळे अशा संचालकांना निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याचा निर्णय सुधारणा विधेयकाने घेतला असल्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27358

Posted by on Mar 16 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (645 of 2451 articles)


नवी दिल्ली, [१५ मार्च] - छगन भुजबळांची अटक राजकीय सूडातून झाली असून राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या पूर्ण पाठीशी असून आम्ही त्यांच्यासाठी ...

×