Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » सहमतीचे संबंध बलात्कार नाही

सहमतीचे संबंध बलात्कार नाही

=मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा=
mumbai-high-courtमुंबई, [११ मार्च] – विवाहाआधीच आपल्या जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात, हे सुशिक्षित तरुणींना चांगलेच माहीत असते. त्यामुळे अशी प्रकरणे बलात्काराच्या परिभाषेत नक्कीच येत नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला.
सोलापूरच्या एका तरुणाला अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्या. मृदुला भाटकर यांच्या एकल पीठाने उपरोक्त मत व्यक्त केले. मुंबईतील या तरुणीसोबत माझे प्रेमसंबंध होते. आम्ही सुमारे एक वर्ष दररोज एकमेकांना भेटत आलो. याच काळात आमच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. पण, न टाळता येणार्‍या कारणांमुळे मला तिच्यासोबतचे नाते तोडावे लागले. यामुळे संतप्त होऊन तरुणीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये माझ्याविरोधात बलात्कार आणि फसवणुकीची तक्रार नोंदविली, अशी भूमिका या तरुणाने विशद केली. विशेष म्हणजे, या तरुणीनेही आपल्या तक्रारीत, आम्ही गेल्या वर्षी मार्चमध्ये एकमेकांना भेटलो आणि प्रेमात पडलो. यानंतर त्याने लग्नाचे आश्‍वासन देऊन माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे नमूद केले आहे.
या प्रकरणी न्या. भाटकर म्हणाल्या की, माझ्या मते, तुमच्यात जे संबंध आले ते परस्परांच्या सहमतीनेच. त्यामुळे त्याला बलात्कार म्हणता येणार नाही. तरुणाने जेव्हा शरीर संबंधाची मागणी केली, तेव्हा तरुणीने नकार द्यायला हवा होता. ती शिकलेली आहे आणि विवाहापूर्वी शारीरिक संबंध ठेवल्यास होणार्‍या परिणामांची माहिती तिला आहे. सोबतच, तरुणाला अटकपूर्ण जामीत मंजूर करण्यात येत असला, तरी त्याने यापुढे तिची भेट घेण्याचा आणि तिला व तिच्या परिवारातील सदस्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नये, असेही न्या. भाटकर यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27236

Posted by on Mar 12 2016. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (691 of 2452 articles)


नवी दिल्ली, [११ मार्च] - भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो येत्या वर्षभरात सात देशांचे २५ उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. ...

×