Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » सहाव्या वेधशाळेची उलटगणती सुरू

सहाव्या वेधशाळेची उलटगणती सुरू

=उद्या अंतराळात झेपावणार=
IRNSSचेन्नई, [८ मार्च] – भारताचा सहावा नेव्हीगेशनल उपग्रह ‘आयआरएनएसएस-१एफ’ च्या प्रक्षेपणासाठी आज मंगळवारी आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रात सकाळी साडेनऊ वाजता ५४ तासांची उलटगणती सुरू करण्यात आली. गुरुवारी ‘पीएसएलव्ही-सी ३२’च्या साह्याने हा उपग्रह अंतराळात झेपावणार आहे.
या मिशनच्या तयारीचा आढावा घेणार्‍या समितीने आणि प्रक्षेपणाचे अधिकार असलेल्या मंडळाने मंजुरी दिल्यानंतर उलटगणती सुरू करण्यात आली, असे इस्रोने आज जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून गुरुवारी सायंकाळी चार वाजता हा उपग्रह अंतराळात झेपावेल. आयआरएनएसएस अंतराळ व्यवस्थेतील ‘आयआरएनएसएस-१एफ’ हा सहावा नेव्हीगेशनल उपग्रह असून, यानंतर आणखी एका उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यानंतर भारताची स्वत:ची अत्याधुनिक वेधशाळा अंतराळात स्थापन होणार आहे. सातवे प्रक्षेपण यशस्वी झाल्यानंतर अमेरिकेच्या जीपीएस प्रणालीच्या धर्तीवर भारताची ही वेधशाळा कार्यरत होणार आहे, असे इस्रोने म्हटले आहे.
इस्रोने गेल्या २० जानेवारी रोजी या व्यवस्थेतील पाचवा उपग्रह ‘आयआरएनएसएस-१ सी’ प्रक्षेपित केला होता. त्यापूर्वी १ जुलै २०१३ रोजी ‘आयआरएनएसएस-१ ए’, ४ एप्रिल २०१४ रोजी ‘आयआरएनएसएस-१ बी’, १६ ऑक्टोबर २०१४ रोजी ‘आयआरएनएसएस-१ सी’ आणि २८ मार्च २०१५ ‘आयआरएनएसएस-१ डी’ या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. याच महिन्यात सातही उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याची इस्रोची योजना असल्याने महिन्याच्या अखेरीस सातवा उपग्रहही अंतराळात सोडण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27123

Posted by on Mar 9 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (732 of 2453 articles)


नवी दिल्ली, [८ मार्च] - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमारच्या जिवाला असल्याचा धोक्याचा मुद्दा आज मंगळवारी राज्यसभेत उपस्थित ...

×