Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सहा वर्षीय बालकाला मोदींचे ‘बर्थ डे’ गिफ्ट

सहा वर्षीय बालकाला मोदींचे ‘बर्थ डे’ गिफ्ट

=धन्यवाद… तू गरीब मुलांचा विचार केला=
bhavya-aawte_MODI WRITES TI 6 YEAR BOYनवी दिल्ली, [१८ मार्च] – मध्यप्रदेशच्या देवास येथील अवघे सहा वर्षे वय असलेल्या भव्य आवटेसाठी गेल्या महिन्यातील त्याचा वाढदिवस अविस्मरणीय असाच ठरला. कारण, दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चिमुरड्याला पत्र लिहून त्याला आश्‍चर्याचा सुखद धक्का दिला आहे. आपल्या वाढदिवशी चक्क मोदी आबांकडून आपल्याला इतकी गोड भेट मिळेल, असा विचारही भव्यने केला नसावा.
झाले असे की, भव्य नेहमी आपल्या घराजवळ गरीब मुलांना बघायचा. त्यांच्याकडे शिक्षणाकरिता पैसेही नसायचे. हे सर्व बघून त्याला इतक्या लहान वयातही वाईट वाटायचे. गेल्या महिन्याच्या १९ तारखेला त्याचा वाढदिवस होता. त्याने आपली पिकी बँक फोडली. त्यात १०७ रुपये जमा झाले होते. हे सर्व पैसे त्याने पंतप्रधान मदत निधीसाठी पाठविताना सोबत एक पत्रही लिहिले. हे पैसे गरीब मुलांच्या शिक्षणाकरिता उपयोगात आणा, असे त्याने या पत्रात नमूद केले.
भव्यने लिहिलेले पत्र वाचून नरेंद्र मोदी अक्षरश: गहिवरले. मोदी यांनी त्याला लगेच पत्र पाठविले आणि भव्यचे कौतुक केले. मी तुझी दया भावनेचा आदर करतो. तू भारतातील गरीब मुलांना १०७ रुपये दान दिले आहे. या गरीब मुलांबाबत विचार करणे आणि त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी मी तुझा आभारी आहे, असे मोदी यांनी पत्रात म्हटले आहे. सोबतच, त्याने दान केलेल्या १०७ रुपयांची पावतीही पाठविली.
दरम्यान, पत्र मिळाल्यापासून भव्य आणि त्याच्या कुटुंबाच्या आनंदाला पारावारच उरला नाही. आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे, असे भव्यचे वडील संदीप आवटे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, भव्यच्या वर्गातील मुलांनीही त्यांच्या पिगी बँकेत जमा असलेली रक्कम गरीब मुलांना दान देण्याचा निर्णय घेतला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21577

Posted by on Mar 19 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1880 of 2453 articles)


=साध्वी प्राची यांचे मत= नवी दिल्ली, [१८ मार्च] - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि भगतसिंग यांच्यामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे. ...

×