Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सागरमला प्रकल्पातून १ कोटी रोजगाराच्या संधी: गडकरी

सागरमला प्रकल्पातून १ कोटी रोजगाराच्या संधी: गडकरी

nitin gadkari1नवी दिल्ली, [९ एप्रिल] – केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी सागरमला प्रकल्पातून येत्या चार-पाच वर्षांत देशात एक कोटीहून जास्त रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज शनिवारी सांगितले.
राष्ट्रीय सागरमला प्रकल्पाच्या दुसर्‍या शिखर परिषदेची बैठक राजधानीतील एनडीएमसी सेंटरमध्ये गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला पोलाद आणि खाण मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि वन आणि पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले की, सागरमला प्रकल्पातून जहाजबांधणी आणि बंदर क्षेत्रातच १ कोटी रोजगार उपलब्ध होतील. यातील ४० टक्के रोजगार प्रत्यक्ष, तर ६० टक्के रोजगार अप्रत्यक्षपणे उपलब्ध होतील.
देशातील ७५०० किमी लांबीच्या समूद्रकिनार्‍यावर आणि देशातील १४५०० किमी लांबीच्या जलमार्गातून वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने तसेच देशातील प्रमुख बंदरांचा व्यापारिक विकास करण्यासाठी सागरमला प्रकल्प आहे, याकडे लक्ष वेधत गडकरी म्हणाले की, मुंबईत १४ एप्रिलपासून सुरू होणार्‍या मेरिटाईम इंडिया समीटमध्ये २ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार होण्याची शक्यता आहे.
बंदरांच्या विकासातून देशाच्या समृद्धीचा मार्ग खुला होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होतेे. मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच समुद्री क्षेत्राच्या विकासातून भारतात जास्तीतजास्त गुंतवणूक आणण्यासाठीच या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
सागरमला योजनेंतर्गंत १५० नव्या प्रकल्पांची निवड करण्यात आली असून, राष्ट्रीय महामार्ग तसेच जहाजबांधणी मंत्रालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या विकासाच्या विविध प्रकल्पांतून देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात २ टक्क्यांची भर पडणार असल्याचा दावाही गडकरी यांनी यावेळी केला.
देशातील ११६ नद्यांमधून जलवाहतूक सुरू करण्याच्या कामाने गती घेतली असून, लवकरच याचा फायदा आपल्याला दिसून येईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27790

Posted by on Apr 10 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (497 of 2453 articles)


=६१ जागांसाठी सोमवारी मतदान= नवी दिल्ली, [९ एप्रिल] - आसाम विधानसभा निवडणुकीसाठी महिनाभरापासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी आज शनिवारी सायंकाळी ...

×