Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी लांबणीवर जाणार

सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी लांबणीवर जाणार

7th pay commissionनवी दिल्ली, [१८ जानेवारी] – पुढील आर्थिक वर्षात सरकारला निधीची कमतरता भासणार असल्याने, कोट्यवधी रुपयांचा बोजा टाकणार्‍या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे
१ जानेवारी २०१६ पासूनच हा वेतन आयोग लागू करण्याचा सरकारचा प्रस्ताव होता. पण, आर्थिक टंचाईमुळे किमान एक वर्षाकरिता आयोगाची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्याकरिता सचिवांची सर्वाधिकार समिती गठित करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला होता, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
केंद्रीय कर्मचार्‍यांच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये तसेच निवृत्त कर्मचार्‍यांच्या पेन्शनमध्ये वाढ करणार्‍या या वेतन आयोगाची अंमलबजावणी लांबणीवर टाकणे, एवढाच एकमेव पर्याय केंद्र सरकारपुढे सध्या उपलब्ध असल्याचे वृत्तात म्हटले आहे. २९ फेबु्रवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी संसदेतील आपल्या भाषणात ते वेतन आयोग लांबणीवर टाकण्यात येणार असल्याचा उल्लेख करण्याची शक्यता आहे, असेही यात नमूद आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26563

Posted by on Jan 19 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (897 of 2453 articles)


मुंबई, [१८ जानेवारी] - राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होताच केंद्रातील राज्यमंत्रिपदाचा त्याग करून प्रदेशाध्यक्ष झालेले खासदार रावसाहेब दानवे यांची पुन्हा ...

×