Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सातव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी

सातव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी

Salary_hikeनवी दिल्ली, [२९, जून] – केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी ‘अच्छे दिन’ आले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज बुधवारी झालेल्या बैठकीत सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचार्‍यांना पगारात २३ टक्के वाढ मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचे सातव्या वेतन आयोगाकडे लक्ष लागले होते. अखेर आज बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशींना मंजुरी देण्यात आली. याचा लाभ ४८ केंद्रीय कर्मचार्‍यांना आणि ५५ लाख निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे. एक जानेवारी २०१६ पासून या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. बेसिक वेतनात १४.२७ टक्के आणि भत्यांमध्ये वाढ प्रस्ताविक करण्यात आली आहे. एकूण २३.६ टक्के वेतनवाढ मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगामुळे वेतन आणि निवृत्तीवेतनाचा सरकारवर अतिरिक्त १.०२ लाख कोटींचा भार पडणार आहे.
दरम्यान, नोव्हेंबर २०१५ मध्ये वेतन आयोगाने वेतनवाढी संदर्भातील शिफारशी केल्या होत्या. आयोगाने मूळ वेतनात १५ टक्के वाढ करण्याची शिफारस केली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29013

Posted by on Jun 30 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (164 of 2453 articles)


चीन, पाकिस्तानला जोरदार धक्का परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची अधिकृत घोषणा नवी दिल्ली, [२७ जून] - अणुपुरवठादार देशांच्या गटात (एनएसजी) भारताचा ...

×