Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठीच ‘मन की बात’

सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठीच ‘मन की बात’

=पंतप्रधानांचे विरोधकांना सडेतोड उत्तर=
mann-ki-baat modiनवी दिल्ली, [२० सप्टेंबर] – देशाच्या कानाकोपर्‍यात राहणार्‍या सामान्य माणसापर्यंत पोहोचणे, त्याच्या समस्या जाणून त्या सोडविणे, याच एकमेव उद्देशाने आपला ‘मन की बात’ कार्यक्रम आहे. सरकारची नाळ जर सर्वसामान्यांशी जोडली असेल, तर समाजात व्यापक बदल घडवून आणणे सरकारला सहज शक्य होते आणि म्हणूनच हा कार्यक्रम आवश्यक आहे, असे सडेतोड उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी आपल्या विरोधकांना दिले.
आकाशवाणीवरील आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२ व्या भागात पंतप्रधानांनी अनेक मुद्यांना स्पर्श केला. यापूर्वीच्या ११ भागांमध्ये चर्चा झालेल्या मुद्यांवरही त्यांनी प्रकाश टाकला. बिहार विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ‘मन की बात’वर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी कॉंगे्रस, जदयु व राजदने केली होती. पण, निवडणूक आयोगाने ती धुडकावून लावली. या सहकार्याबद्दल आयोगाचे आभार मानताना पंतप्रधानांनी, तरुणांना जास्तीत जास्त संख्येत मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आणि मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचेही आवाहन केले. आधी निवडणूक आयोग केवळ नियामक म्हणून काम करीत होता. पण, गेल्या काही वर्षांच्या काळात आयोगाला आपल्या खर्‍या दायित्वाची जाणीव झाली आहे. मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्याचे आणि त्यांना मतदानासाठी प्रेरित करण्याचे महान कार्य आयोगाने केले आहे. पण, जागृती निर्माण करण्याची जबाबदारी एकट्या आयोगाची नसून, आपल्या सर्वांचीच आहे, असे मतही पंतप्रधानांनी व्यक्त केले.
आपल्या सरकारने मागील सव्वा वर्षाच्या काळात अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या. ‘सेल्फी वुईथ डॉटर’ आणि ‘गिव्ह अप सबसिडी’ या योजनांना भरपूर प्रतिसाद मिळाला. सुमारे ३० लाख कुटुंबीयांनी स्वेच्छेने एलपीजी सिलेंडरवर मिळणार्‍या अनुदानाचा त्याग केला. ही एक ‘मौन क्रांती’च आहे. यात केवळ श्रीमंतच नव्हे, तर अनेक गरिबांचाही समावेश आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
आजच्या नकारात्मक वातावरणातही सर्वसामान्य जनता सकारात्मक विचारांसह पुढे येत आहे. नवनव्या कल्पना सुचवत आहे. लोकांचेच विचार आणि सल्ला घेऊन मी बोलत आहे. ‘मन की बात’ हा कार्यक्रम आता माझा राहिला नसून, तो देशभरातील सर्वसामान्यांचा झाला आहे.
महात्मा गांधी यांनी स्वदेशीचा नारा दिला होता. त्यांच्याच साक्षीने मी खादी वापरण्याचे आवाहन देशवासीयांना केले होते. त्यानंतर देशात खादीच्या कपड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. एक फॅशन म्हणून लोक खादीचे कपडे वापरू लागले आहेत. पण, खादीचा केवळ वापर व्हायला नको, तर आपल्या आयुष्यातही खादीला महत्त्वाचे स्थान द्या, असेही पंतप्रधान म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23971

Posted by on Sep 21 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1432 of 2453 articles)


१४ ऑक्टोबरला भेट निश्‍चित पीएमओकडून सात वेळा दूरध्वनी चर्चेतील अजेंडा ठरविण्याची सूचना कोलकाता, [२० सप्टेंबर] - पश्‍चिम बंगाल सरकारने ...

×