Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सामान्य जनतेला प्रश्‍न विचारण्याचा अधिकार

सामान्य जनतेला प्रश्‍न विचारण्याचा अधिकार

  • आरटीआयचे उत्तर वेळीच द्यावे
  • पंतप्रधानांनी स्पष्ट भूमिका
  • सरकारी विभागांना दिला तीन ‘टी’चा मंत्र

narendra-modi-budgetनवी दिल्ली, [१६ ऑक्टोबर] – राज्यकारभारातील चुका आणि उणिवा दूर करण्यासाठी माहिती अधिकार कायदा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे आरटीआय अंतर्गत विचारण्यात येणार्‍या प्रश्‍नांना वेळीच आणि समर्पक उत्तरे द्यायलाच हवी. लक्षात ठेवा, सरकारच्या कामकाजाविषयी प्रश्‍न विचारण्याचा अधिकार प्रत्येकच नागरिकाला आहे, अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी विशद केली.
माहिती प्राप्त करण्याचा अधिकार हा केवळ माहिती मिळविण्यासाठीच नसून, तो प्रश्‍न विचारण्यासाठी देखील आहे. लोकशाहीवरील विश्‍वास आणखी दृढ होण्यास यामुळे मदत होते. माहिती अधिकार कायदा लोकशाहीसाठी महत्त्वाचा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. केंद्रीय माहिती आयोगाच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांनी सर्व सरकारी विभागांना तीन ‘टी’चे महत्त्व सांगितले. आरटीआयअंतर्गत आलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना ‘टाईमलीनेस, ‘ट्रान्सपरन्सी’ आणि ‘ट्रबल-फ्री ऍप्रोच’ या तीन ‘टी’ चे काटेकोर पालन करायलाच हवे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आजचे युग पारदर्शक आहे, या युगात वेळेला फार महत्त्व असून, गोपनीयतेला कुठेही जागा नाही. राज्यकारभार जितका पारदर्शी असेल, नागरिकांना त्यातून तेवढाच फायदा मिळत असतो आणि राज्यकारभारातील उणिवा व चुका दुरुस्त होण्यासही मदत मिळते. लोकशाहीवर लोकांचा विश्‍वास आणखी मजबूत करायचा असेल, तर आरटीआयच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक प्रश्‍नाचे वेळीच आणि पारदर्शक पद्धतीने उत्तर द्यायलाच हवे, असेही पंतप्रधान म्हणाले.
‘डिजिटल इंडिया’ अभियानाद्वारे सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध केली जाणार असून, त्यामुळे पारदर्शकतेला विश्‍वासार्हतेत रूपांतरित करणे शक्य होणार आहे. माहिती अधिकार कायदा हा सुप्रशासनाचे एक माध्यम आहे, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25156

Posted by on Oct 17 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1330 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१५ ऑक्टोबर] - ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ...

×