Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकल्यास ५००० रुपयांपर्यंत दंड

सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकल्यास ५००० रुपयांपर्यंत दंड

swachha bharat abhiyanनवी दिल्ली, [२६ मार्च] – उघड्यावर शौच व मूत्र विसर्जन करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणे यापुढे खूप महागात पडू शकते. केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिलेल्या निर्देशानुसार आता अशा लोकांकडून किमान २०० ते ५००० रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. ३० एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला शहरा-शहरातून म्हणावा तितका प्रतिसाद न मिळाल्याने आता ही सक्तीची कारवाई केली जाणार आहे. शहर विकास मंत्रालयाने याबाबत सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांशी बोलणी करताना असे सांगितले की, ३० एप्रिलपर्यंत प्रत्येक शहराच्या किमान एका वॉर्डमध्ये आणि ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत सर्व शहरांच्या सर्व वॉर्डमध्ये अशा आरोपींवर दंड लागू करण्यात यावा.
याशिवाय प्रत्येक राज्याकरिता मंत्रालयाने ठराविक संख्येइतकी सार्वजनिक शौचालये आणि कचरापेट्या उभारण्यासही वेळेची मर्यादा आखून दिली आहे. प्रत्येक घरातून कचरा गोळा करण्याकरिता तशी व्यवस्था, प्रत्येक स्थानकावर आणि वॉर्डातील प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी कचरापेट्या उभारल्या जाव्या, असे मंत्रालयाने सांगितले आहे. तसेच दंड आकारण्यापूर्वी या स्वच्छता सुविधा तयार केल्या जाव्यात, असेही सांगण्यात आले आहे.
मंत्रालयाच्या केंद्रीय सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण अभियांत्रिकी संघटनेतर्फे दिलेल्या मानकांनुसार, शहरातील प्रत्येक एक किमीच्या रस्त्यावर एक स्वच्छतागृह असावे आणि महिला व पुरुष दोघांकरिता समान संख्येत स्वच्छतागृहे उभारली जावीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27589

Posted by on Mar 27 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (567 of 2453 articles)


=भाजपाला धन्यवाद= श्रीनगर, [२६ मार्च] - पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि भाजपाचे निर्मल सिंह यांनी आज शनिवारी राजभवनात राज्यपाल एन. ...

×