Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » सार्वभौमत्त्वाला आव्हान सहन करणार नाही

सार्वभौमत्त्वाला आव्हान सहन करणार नाही

=राजनाथसिंह यांचा रोखठोक इशारा=
Rajnath-Singh_1रायपूर, [१६ एप्रिल] – पाकिस्तान या शेजारी देशासोबतचे संबंध सुधारण्याचा भारताने सातत्याने प्रयत्न केला, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले असून, भारताचा आदरसन्मान व सार्वभौमत्त्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न झाल्यास तो कदापि सहन करणार नाही, असा रोखठोक इशारा दिला.
‘जगातील कोणत्याही देशाचा मानसन्मान व सार्वभौमत्त्वावर कोणीही प्रश्‍नचिन्ह उपस्थित करू नये, असे आम्हाला वाटते. परंतु, भारताच्या सार्वभौमत्त्वाबाबत कोणी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्यास ते सहन करणार नाही,’ असे राजनाथसिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पाकव्याप्त काश्मिरातील असंख्य लोक सरकारविरोधात आंदोलन करून स्वातंत्र्याची मागणी करत असल्याच्या एका व्हिडीओबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते बोलत होते.
मीदेखील तो व्हिडीओ बघितला आहे. भारतापुरता विचार करायचा झाल्यास हा देश सार्वभौम आहे आणि पाकिस्तानही. दोन्ही देशांमध्ये मधुर द्विपक्षीय संबंध असावे, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. या घटनेबाबत पाकने पुढाकार घ्यायला हवा, असे गृहमंत्र्यांनी कुशाभाऊ ठाकरे पत्रकारिता व अवाम जनसंचार विश्‍वविद्यालयाच्या दीक्षांत समारंभाच्या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
त्यापूर्वी, नवीन सर्किट हाऊस येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत राजनाथसिंह यांनी छत्तीसगडमधील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी नक्षलविरोधी मोहीम आणि नक्षलप्रभावित क्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेतला. मुुख्यमंत्री डॉ. रमणसिंह हेदेखील बैठकीला उपस्थित होते.
नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा त्याग केल्यास त्यांच्याशी चर्चा शक्य आहे. लोकशाहीत हिंसाचाराला कोणतेही स्थान नाही. चर्चेसाठी त्यांनी आधी हिंसाचाराचा त्याग करावा हे मी यापूर्वीदेखील सांगितले आहे, असेही राजनाथसिंह यावेळी म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27831

Posted by on Apr 17 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (489 of 2453 articles)


सभापती, उपसभापती, विरोधी पक्षनेते एकाचवर्षी निवृत्त होणार विधान परिषद इतिहासातील पहिलीच घटना मुंबई, [१६ एप्रिल] - महाराष्ट्र विधान परिषदेच्या ...

×