Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सार्वमतानेच ठरणार राष्ट्रीय शिक्षण धोरण

सार्वमतानेच ठरणार राष्ट्रीय शिक्षण धोरण

=स्मृती इराणी यांची माहिती=
smriti-irani_5आगरतळा, [१९ सप्टेंबर] – राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यासाठी समाजाच्या तळागळातील नागरिकांचे मत विचारात घेण्याची प्रक्रिया आपल्या मंत्रालयाने सुरू केली आहे. सर्व नागरिकांचे मत विचारात घेऊनच धोरण निश्‍चित केले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी येथे दिली.
देशाचे शिक्षण धोरण कसे असावे, यावर देशाच्या तळागळातील इतक्या मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक प्रथमच आपले मत देणार आहेत. याचवर्षीच्या डिसेंबरअखेरपर्यंत राष्ट्रीय धोरणाचा मसुदा तयार झालेला असेल, असे स्मृती इराणी यांनी शुक्रवारी त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ईशान्येतील सर्व आठही राज्यांचा समावेश असलेली पहिली प्रादेशिक बैठक शुक्रवारी आगरतळा येथे घेण्यात आली. या राज्यांचे शिक्षणमंत्री आणि त्यांच्या प्रतिनिधींनी प्रस्तावित राष्ट्रीय शिक्षण धोरणावर आपले मत व्यक्त केले आहे. या धोरणावर राष्ट्रीय स्तरापासून, तर ग्रामपंचायत स्तरापर्यंत सर्वांचेच मत विचारात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्याला सर्वच स्तरांतून चांगला प्रतिसादही मिळत आहे, असे त्या म्हणाल्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23916

Posted by on Sep 20 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1441 of 2453 articles)


=निवडणूक आयोगाचा पुढाकार= नवी दिल्ली, [१९ सप्टेंबर] - इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेत ज्याप्रमाणे राजकीय पक्षांचे उमेदवार आणि निवडणूक चिन्ह असते, त्याचप्रमाणे ...

×