Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » सावरकरांचे विचार आचरणात आणावे : सरसंघचालक

सावरकरांचे विचार आचरणात आणावे : सरसंघचालक

=स्वा. सावरकरांच्या ५० व्या आत्मार्पण वर्षारंभाला प्रारंभ=
dr.mohan_bhagwat 2मुंबई, [२६ फेब्रुवारी] – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदू या शब्दाला चिकटलेला संकुचित अर्थ सर्वप्रथम दूर केला आणि त्यातून राष्ट्रहिताचे गमक आपल्या ‘हिंदुत्व’ या ग्रंथातून सांगितले. त्यांनी सांगितलेल्या या बळकट शक्तींचा उगम सामूहिक आचरणातून होतो. आजच्या परिस्थितीत देखील त्यांचे विचार हे प्रखर राष्ट्रतेज वाढविण्यासाठी समर्पक आहेत. म्हणूनच प्रत्येकाने आपल्यात सावरकरांना जगले पाहिजे, त्यांच्या विचारांनुसार कृतिशील कार्य केले पाहिजे, असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ५० व्या ‘आत्मार्पण वर्षा’चा प्रारंभ करण्यात आला असून वर्षभर त्यानिमित्त देशभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, त्याची सुरुवात सरसंघचालकांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कृतिशील अनुयायी विक्रम सावरकर यांच्या आठवणींवर आधारित त्यांच्या अनुयायांनी लिहिलेल्या ‘एक चैतन्यझरा’ या ग्रंथाचे प्रकाशन विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्या हस्ते पार पडले. त्यांचेच एक अनुयायी प्रताप वेलकरलिखित ‘विक्रमादित्य सावरकर’ हे पुस्तकदेखील यावेळी प्रकाशित झाले. सरसंघचालकांच्या हस्ते आत्मार्पण वर्षाच्या विशेष बोधचिन्हाचे देखील अनावरण झाले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडलेला विचार हा वैदिक जीवनशैलीचा असून त्याला जातीच्या किंवा धर्माच्या नावाखाली बंदिस्त करता येणार नाही, हे सत्य आता पुरोगामी म्हणविणार्‍यांनी समजून घेतले पाहिजे, असे विचार जांबुवंतराव धोटे यांनी मांडले. स्वातंत्र्यवीरांचा खरा वारसा विक्रम सावरकर यांनीच चालवला. विक्रमराव आणि माझा एकत्रित सर्वाधिक काळ हा आंदोलनामुळे भोगलेल्या तुरुंगवासातच गेला, त्यामुळे त्यांच्या विचारांतून एक नाते जडले गेले आणि ते रक्ताच्या नात्याहून अधिक घट्ट झाले, असेही त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांना अनुकूल असे उपक्रम देशपातळीवर राबवत असताना त्याला बळकटी मिळण्याच्या दृष्टीने सर्वांनी एकत्रितपणे कार्य केले पाहिजे, त्यासाठी या वर्षात स्मारक अधिक प्रयत्नशील राहील. स्मारकाच्या माध्यमातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सावरकरांचा विचार अधिक प्रभावीपणे प्रसारित करण्याचे कार्य होत असून ते अधिक प्रभावीपणे भविष्यात राबवले जाईल, अशी ग्वाही स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी यांनी दिली.
स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, स्वामिनी विक्रम सावरकर तसेच पदाधिकारी व सावरकरभक्त आणि देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रसिद्ध निवेदिका मंजिरी मराठे यांनी केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20882

Posted by on Feb 27 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (2008 of 2451 articles)


=तरुण विजय यांचे पर्रिकरांना निवेदन= नवी दिल्ली, [२६ फेब्रुवारी] - संरक्षण व्यवहाराविषयक संसदेच्या स्थायी समितीचे सदस्य असलेले भाजपा खासदार तरुण ...

×