Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » सावरकरांना भारतरत्न द्या!

सावरकरांना भारतरत्न द्या!

=उद्धव ठाकरे यांची शिवतीर्थावर मागणी=
veer savarkarमुंबई, [२३ ऑक्टोबर] – स्वातंत्र्यवीर सावकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळायला हवा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवतीर्थावर झालेल्या शिवसेनेच्या दसर्‍या मेळाव्यात बोलताना केली.
सावरकरांचे साहित्य चेपून टाकण्याचे काम झाले आहे, असे म्हणत, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळावे, यासाठी शिवसैनिकांनी गावागावात मोहीम सुरू करावी, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले, तसेच पाकिस्तान आणि महागाईच्या मुद्यावर देखील त्यांनी भाजपावर टीका केली. मात्र, आपला पक्ष सत्तेबाहेर पडणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.
‘‘पाकिस्तानच्या बाबतीत शिवसेनेची भूमिका कधीच बदलणार नाही. मला वाद नको आहे, केंद्र व राज्यातील सरकार जनतेची शेवटची आशा आहे, असेही ते म्हणाले. मला देवळात घंटा वाजवणारा हिंदू नको, तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा आहे. अतिरेकी घुसल्यावर आपण फक्त मेणबत्त्या पेटवायच्या, आता कुठे गेल्या मेणबत्त्या, अशी टीका त्यांनी केली. १९९३ च्या दंगलीत शिवसैनिकांनीच मुंबई वाचवली. भारताला ‘हिंदू राष्ट्र’ म्हणून घोषित करा, समान नागरी कायदा लागू करा. मग, कोण गाय कापतं ते बघून घेऊ,’’ असे ते म्हणाले.
हिंदुस्थानातील कडवट निधर्मी हे मुस्लिमांच्या बाजूचे आहेत, असे खुद्द तस्लिमा नसरीन यांनी सांगितले, हे नशीबच आहे. हिंदू अजूनही बेवारस झालेला नाही. साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांना अटक झाली, अजून आरोप ठेवण्यात आलेले नाहीत, मग त्यांना लोणचे घालण्यासाठी तुरुंगात ठेवले आहे का?’’ असे बोलून त्यांनी न्यायव्यवस्थेचा समाचार घेतला.
पानसरे-दाभोळकर यांच्या हत्येनंतर लगेच हिंदुत्ववादी संघटनांवर आरोप झाले, समीर गायकवाडला अटक झाली; पण अजूनही चौकशी सुरूच आहे, हिंदूंच्या बाबतीत कोणीही बोलत नाहीत. दाभोळकर-पानसरे यांची हत्या करणार्‍यांना भरचौकात फाशी द्यायला हवी,’’ असेही त्यांनी सांगितले.
औरंगजेब-अफझल खान आमचा कोणीही लागत नाही. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर असे झालेच पाहिजे,’ अशी मागणीही त्यांनी केली. औरंगजेब रस्त्याचे नाव बदलले, तर हिरवी मते जातील, अशी भीती कॉंग्रेसला वाटते, अशी टीका त्यांनी केली. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर होते, मग ते आता का शक्य होत नाही. सत्तेवर असताना महागाईवर माझ लक्ष गेलं नाही, तर मी जनतेला तोंड दाखवू शकत नाही,’ असे म्हणत त्यांनी महागाईवर तोंडसुख घेतले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25262

Posted by on Oct 24 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1300 of 2452 articles)


नवी दिल्ली/मुंबई, [२१ ऑक्टोबर] - पाच राज्यांमधील धाडसत्रात डाळीचा ५८०० टन साठा जप्त करण्यात आल्यानंतर काळाबाजारी आणि साठेबाजांविरुद्ध महाराष्ट्रातील १६ ...

×