Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » सावरकर, भगतसिंग यांच्यामुळेच देशाला स्वातंत्र्य

सावरकर, भगतसिंग यांच्यामुळेच देशाला स्वातंत्र्य

=साध्वी प्राची यांचे मत=

Sadhvi Prachi. Picture from her facebook account.नवी दिल्ली, [१८ मार्च] – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि भगतसिंग यांच्यामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे. यात महात्मा गांधी यांचे काहीही योगदान नाही, असे मत विश्‍व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी व्यक्त केले आहे.
उत्तर प्रदेशच्या बहराईच येथे विहिंपतर्फे आयोजित कार्यक्रमात साध्वी प्राची बोलत होत्या. साध्वी प्राची यांनी यापूर्वी हिंदू महिलेने किमान चार अपत्यांना जन्म द्यावा. तसेच सलमान, शाहरुख आणि आमिर खान यांचे चित्रपट हिंदूंनी पाहू नये, अशी वक्तव्य केली होती. आता त्यांनी महात्मा गांधी यांना लक्ष्य केले आहे.
साध्वी प्राची म्हणाल्या की, महात्मा गांधी यांनी चरखा चालविल्यामुळे किंवा अहिंसा आंदोलन छेडल्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले नाही. तर, भगतसिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बलिदानामुळे मिळाले आहे. जम्मू-काश्मिरातील कट्टर फुटिरतावादी नेता मसरत आलम हा कारागृहाच्या बाहेर आहे, तर साध्वी प्रज्ञा ठाकूर या अजूनही कारागृहातच आहेत. हिंदू समाज ही बाब कदापि मान्य करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21566

Posted by on Mar 19 2015. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (1880 of 2452 articles)


=लवकरच सुरू होणार सेवा= कॅलिफोर्निया, [१८ मार्च] - ज्यांच्या हाती मोबाईल आहेत, त्यांच्यापैकी बहुतांश लोकांकडे फेसबुक या अत्याधुनिक सोशल नेटवर्किंग ...

×