Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » सिंचनाच्या नावाखाली महाराष्ट्रात लूटमार

सिंचनाच्या नावाखाली महाराष्ट्रात लूटमार

=केंद्रीय कृषिमंत्र्यांचा कॉंग्रेस, राष्ट्रवादीवर घणाघात=
Radha-Mohan-Singhनवी दिल्ली, [२६ एप्रिल] – सिंचनाच्या नावाखाली महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांची लूटमार झाली आहे. तेथील धरणे फक्त साखर कारखान्यांसाठीच बांधण्यात आली. या धरणांचा फायदा शेतकर्‍यांऐवजी मूठभर साखर सम्राटांनाच झाला, असा घणाघात केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी आज मंगळवारी लोकसभेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांवर केला. महाराष्ट्रातील दुष्काळावर चर्चा करण्याचे आव्हानही त्यांनी यावेळी आता विरोधात असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले.
प्रश्‍नोत्तराच्या तासात नगर जिल्ह्याला मदत करण्याबाबत शिवसेनेचे शिर्डीचे खा. सदाशिव लोखंडे यांनी प्रश्‍न विचारला असता कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सिंह यांनाच लक्ष्य करणे सुरू केले. त्यामुळे संतप्त झालेले सिंह म्हणाले, हिंमत असेल तर माझे उत्तर संयमाने ऐकण्याचे धाडस दाखवा. महाराष्ट्रात यंदा महाभयंकर दुष्काळ आहे. लातूर, बीड, परभणी, जालना, औरंगाबाद, नांदेड या जिल्ह्यांमधील पाण्याची स्थिती अतिगंभीर आहे. राज्य सरकारने अडीच हजारांपेक्षा जास्त गावांना दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. ही वेळ कशामुळे आली? काही धरणे बांधली गेली; ती पण शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी नव्हे तर साखर कारखान्यांसाठी. सिंचनावर कोट्यवधी रुपयांची खैरात केली गेली; पण त्यातही लूटमार केली गेली. त्यामुळे दुष्काळाची वेळ ओढविली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन गैरव्यवहाराचा आरोप आहे. राधामोहनसिंह यांच्या आक्रमणामागे तोच संदर्भ होता; पण त्यांनी नाव घेण्याचे टाळले. तसेच हजारो कोटी रुपये खर्च करूनही महाराष्ट्राची सिंचनक्षमता फक्त १६-१७ टक्के आहे, हेही त्यांना सुचवायचे होते. सिंह यांच्या उत्तरामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे, कॉंग्रेसचे राजीव सातव यांनी केला; पण सिंह धाडसाने म्हणाले की, हिंमत असेल तर सत्य ऐकण्याचे धाडस ठेवा. महाराष्ट्राच्या दुष्काळाच्या कारणांवर चर्चा करण्याची माझीही मागणी आहे. सत्य समोर आलेच पाहिजे.
अशोक चव्हाण यांनी सभागृहाबाहेर सिंह यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रातील सहकारी चळवळीची साधी कल्पनाही राधामोहनसिंहांना दिसत नाही. ऊस कारखाने कधी सुरू होतात आणि कधी बंद होतात, एवढे जरी त्यांना माहीत असले तरी पुरेसे आहे, असे बोचकारे त्यांनी काढले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28013

Posted by on Apr 27 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (431 of 2453 articles)


=रविशंकर प्रसाद यांचे ऍण्टोनींना आव्हान= नवी दिल्ली, [२६ एप्रिल] - ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी सौद्यात कोणत्या कॉंग्रेस नेत्यांचा सहभाग होता, ...

×