Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सीबीआय अधिकारी, पोलिसांना राष्ट्रपती पदक

सीबीआय अधिकारी, पोलिसांना राष्ट्रपती पदक

rashtrapati padakनवी दिल्ली, [२५ जानेवारी] – टू-जी सेक्ट्रम, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा आणि झारखंडमधील राज्यसभा निवडणुकीच्या काळात आमदारांच्या खरेदी-विक्रीचा तपास करणार्‍या सीबीआय अधिकार्‍यांसह देशातील या सर्वोच्च तपास संस्थेच्या २८ अधिकार्‍यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले.
राष्ट्रपती पोलिस पदकाच्या या यादीत सीबीआयचे सहसंचालक अमरेंद्र कुमार सिंग सर्वोच्च स्थानावर आहेत. बोकारो स्टील प्रकल्प, सेलमधील नियुक्ती घोटाळा आणि झारखंड राज्यसभा निवडणुकीत आमदारांच्या खरेदी-विक्रीच्या चौकशी पथकाचे नेतृत्व त्यांनी केले होते. याशिवाय, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसह भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांचा तपास करणारे ओडिशातील वरिष्ठ पोलिस अधिकारी घनश्याम उपाध्याय, टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा तपास करणारे संजय कुमार सिन्हा यांनाही राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
सोबतच, चेन्नईचे पोलिस अधीक्षक शिवांगनम वेल्लईपंडी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक एन. कृष्णमूर्ती आणि राजीव द्विवेदी तसेच मुंबईचे पोलिस उपअधीक्षक सुमन कुमार यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20048

Posted by on Jan 26 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2173 of 2453 articles)


=तिघांना कीर्ती, १२ जणांना शौर्य चक्र= नवी दिल्ली, [२५ जानेवारी] - लष्करातील नायक नीरज कुमार सिंह आणि राष्ट्रीय रायफल्सच्या ४४ ...

×