Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सुधारणा व परिवर्तनाची प्रक्रिया कायम राहणार

सुधारणा व परिवर्तनाची प्रक्रिया कायम राहणार

=पंतप्रधानांची ग्वाही=
narendra-modi-513नवी दिल्ली, [१२ मार्च] – भारत हा देश स्थिर सूक्ष्म अर्थव्यवस्थेचे केंद्र आहे. या देशात आर्थिक सुधारणा आणि परिवर्तनाची प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे. भविष्यात जास्तीतजास्त विकास साधता येईल, अशा प्रकारची धोरण आपले सरकार कायमस्वरूपी राबविणार आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी दिली.
जगाच्या पाठीवर सर्वाधिक वेगाने विकास करणारी आणि गुंतवणुकीसाठी अनुकुल अर्थव्यवस्था असा नावलौकिक भारताने मिळविला असला, तरी तेवढ्यावर समाधान न मानता देशातील आर्थिक सुधारणांचा वेग वाढविण्यावरच आमचा भर राहणार आहे, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि जागतिक नाणेनिधीच्या संयुक्त विद्यमाने राजधानी दिल्लीत आयोजित ‘ऍडव्हान्सिंग आशिया : इन्व्हेस्टमेंट फॉर द फ्युचर’ यावरील परिषदेत नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ऑक्टोबर २०१७ पासून कोट्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या निर्णयाचे आम्ही स्वागत केले आहे. कोट्यात बदलाचा अर्थ एखाद्या देशाला अतिरिक्त आधार देणे असा होत नाही. हा प्रामाणिक व कायदेशीरतेचा मुद्दा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
नाणेनिधीच्या अध्यक्ष ख्रिस्तीन लेगार्ड यादेखील परिषदेत सहभागी झाल्या आहेत. चीन व जपानसह भारताचाही नाणेनिधीतील आघाडीच्या १० देशांमध्ये समावेश झाला, ही आनंदाची बाब असल्याचे ते म्हणाले. मोठा व्याप आणि विविधतापूर्ण देश आर्थिक विकास झपाट्याने राबवू शकतो आणि सामाजिक स्थैर्यही आणू शकतो, हे भारताने आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27264

Posted by on Mar 13 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (679 of 2453 articles)


=सेबीचे कठोर पाऊल, अनेक पदांवरून विजय माल्या बाहेर होणार= नवी दिल्ली, [१२ मार्च] - बँकांकडून मोठमोठे कर्ज घेतल्यानंतर ते हेतुपुरस्सर ...

×