Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » सुप्रीम कोर्टाचा काही तासातच निर्णय मागे

सुप्रीम कोर्टाचा काही तासातच निर्णय मागे

=टु-जी स्पेक्ट्रम घोटाळा=
SupremeCourtनवी दिल्ली, [६ फेब्रुवारी] – टु-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित एअरसेल-मॅक्सिस व्यवहार प्रकरणी द्रमुक नेते दयानिधी मारन आणि त्यांचा भाऊ कलानिधी यांना विशेष न्यायालयाच्या समन्सविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याचा आदेश दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अवघ्या काही तासातच आपला निर्णय मागे घेतला.
सकाळी मारन बंधूंची आव्हान याचिका न्या. व्ही. गोपालगौडा आणि न्या. आर. बानुमती यांच्या दोन सदस्यीय न्यायासनापुढे सुनावणीसाठी आली असता, न्यायालयाने त्यांना दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणी दाद मागण्याचा सल्ला दिला होता. तथापि, टु-जी स्पेक्ट्रमशी संबंधित सर्वच खटले केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीतच चालविले जातील, या सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील एका न्यायासनाच्या निकालाकडे सीबीआयने या न्यायालयाचे लक्ष वेधले आणि न्यायालयाने लगेच आपला निर्णय मागे घेतला.
या घोटाळ्याचा तपास अजूनही सुरूच आहे आणि या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही खटल्यावर सर्वोच्च न्यायालय वगळता अन्य कोणतेही न्यायालय सुनावणी करू शकत नाही, असे सीबीआयच्या वतीने युक्तिवाद करताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद यांनी सांगितले. यानंतर या न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील न्यायासनापुढे ९ फेबु्रवारी रोजी करण्याचे निश्‍चित केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20347

Posted by on Feb 7 2015. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (2111 of 2453 articles)


दिल्ली विधानसभा निवडणूक ४५ जागा मिळण्याचा अंदाज आपला २५ जागा आरडीआयचा सर्व्हे नवी दिल्ली, [५ फेब्रुवारी] - दिल्ली विधानसभा ...

×