Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » सुप्रीम कोर्टाचा तिस्ता सिटलवाडला दिलासा

सुप्रीम कोर्टाचा तिस्ता सिटलवाडला दिलासा

TISTA SATALWADनवी दिल्ली/मुंबई/अहमदाबाद, [१२ फेब्रुवारी] – २००२ च्या गुजरात दंगल पीडितांना मदतीच्या नावाखाली गोळा करण्यात आलेल्या निधीचा अपहार केल्याचा आरोप असलेल्या तिस्ता सिटलवाड यांच्या अटकेला उद्या शुक्रवारपर्यंत स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तात्पुरता दिलासा दिला आहे.
गुजरात उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर राज्य पोलिस तिस्ता सिटलवाड यांना अटक करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत, असे प्रख्यात विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या नेतृत्वातील न्यायासनाने सिटलवाड यांच्या अटकेला शुक्रवारपर्यंत स्थगिती दिली. सिटलवाड यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात उद्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या कामकाजादरम्यान सिब्बल यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि गुजरात पोलिसांचा मोठा फौजफाटा त्यांच्या मागावर असल्याचे सांगितले. तत्पूर्वी, गुरुवारी सकाळी गुजरात उच्च न्यायालयाने सिटलवाड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला होता. आरोपी तपासात योग्य प्रकारे सहकार्य करत नाही आणि निधीचा खाजगी कामासाठी गैरवापर झाल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्यामुळे आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर करता येणार नाही, असे न्या. पार्डिवाला यांनी आपल्या निर्णयात सांगितले. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार उप-निरीक्षकाच्या नेतृत्वात एक पथक गुरुवारी दुपारी सिटलवाड यांच्या जुहू येथील निवासस्थानी पोहोचले असता त्या व त्यांचे पती जावेद आनंद दोघेही घरी नव्हते. सिटलवाड यांनी आपल्या सुरक्षा रक्षकांना बंगल्यावरच राहायला सांगितले. तिस्ता सिटलवाड गुरुवारी सकाळी ८ वाजता घराबाहेर पडल्या आणि बहुदा त्या दिल्लीत असाव्या, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20527

Posted by on Feb 13 2015. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (2067 of 2453 articles)


पाटणा, [१२ फेब्रुवारी] - बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी येत्या २० फेब्रुवारी रोजी आपले बहुमत सिद्ध करावे, असे निर्देश ...

×