Home » गुजरात, ठळक बातम्या, राज्य » सुरक्षा रक्षकांची भीती वाटते : जशोदाबेन

सुरक्षा रक्षकांची भीती वाटते : जशोदाबेन

=माहितीच्या अधिकारात मागविला तपशील=
jashodabenअहमदाबाद, [२५ नोव्हेंबर] – ‘देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या सुरक्षा रक्षकांकडून झाली होती. मलाही सुरक्षा रक्षकांची भीती वाटते,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांनी म्हटले आहे. तसेच, आपल्याला सुरक्षा कोणत्या अधिकारात दिली, याचा तपशील त्यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मागविला आहे.
‘मला कोणत्या कायद्यांतर्गत आणि कोणाच्या विनंतीवरून सुरक्षा पुरवण्यात आली आहे,’ असा सवाल जशोदाबेन यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जात उपस्थित केला आहे. त्यांनी हा अर्ज गुजरातीतून दाखल केला आहे. तसेच, ज्या कायद्याखाली आपल्याला विशेष पोलिस सुरक्षा बंधनकारक आहे, त्याची प्रतही देण्यात यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
‘मला सुरक्षा दिली असली तरी मी स्वत: सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करते आणि माझे सुरक्षा रक्षक सरकारी गाड्यांमधून बरोबर येतात,’ असेही जशोदाबेन यांनी अर्जात नमूद केले आहे.
एसपीजी सुरक्षेसह पंतप्रधानांच्या कुटुंबाची सदस्य म्हणून कोणते लाभ आहेत, कोणते प्रोटोकॉल पाळण्याची आवश्यकता आहे, याची माहितीही त्यांनी मागितली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जासोबत केलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रथमच जशोदाबेन यांचा पत्नी म्हणून उल्लेख केला आहे. त्यानंतर, मोदी पंतप्रधान झाल्यावर प्रोटोकॉलनुसार जशोदाबेन यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=18573

Posted by on Nov 26 2014. Filed under गुजरात, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in गुजरात, ठळक बातम्या, राज्य (2334 of 2452 articles)


=साध्या मोबाईलवरही सुरू होणार नेट बँकिंग= मुंबई, [२४ नोव्हेंबर] - सध्या नेट बँकिंगची सुविधा केवळ इंटरनेट असलेल्या महागड्या मोबाईलवरच उपलब्ध ...

×