Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » सुवर्ण ठेव खाते सुरू होणार

सुवर्ण ठेव खाते सुरू होणार

=देशातील टांकसाळीतच घडणार नाणी=
gold coin saleनवी दिल्ली, [२८ फेब्रुवारी] – सोन्याच्या आयातीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या सर्वाधिक सोन्याची नाणी विदेशातून आयात केली जातात. त्यामुळे, मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर देशात असलेल्या २० हजार टनांपेक्षा अधिक सोन्याचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी, सुवर्ण ठेव खाते योजनेची सुरुवात करण्यात येईल.
योजनेअंतर्गत खातेदाराला व्याज देण्यात येईल आणि सराफा व्यापारी त्यावर कर्जही घेऊ शकतील. सोने खरेदीला पर्याय म्हणून सरकार सार्वभौम सुवर्ण रोख्यांची सुरुवात करणार आहे. त्यावर एका निश्‍चित दराने व्याज मिळेल आणि सोन्याच्या किमतीनुसार परतावाही मिळेल. मात्र, सोन्यावरील दहा टक्के आयात शुल्क कमी करण्याविषयी अर्थमंत्री जेटली यांनी काहीही सूतोवाच केले नाही. देशात मोठ्या प्रमाणावर सोने आहे. त्याची कुठेही नोंद नाही आणि ते उद्योगातही वापरले जात नाही. मात्र, वर्षाकाठी ८०० ते १ हजार टन सोन्याची आयात केली जाते. सध्याच्या सुवर्ण ठेवी योजना आणि सुवर्ण कर्ज योजनेत बदल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सोन्यात गुंतवणूक करण्यात भारतीय नागरिक आधीपासूनच आघाडीवर आहेत. त्यांचा हा कल लक्षात घेऊन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एका नव्या योजनेची सुरुवात करण्याची घोषणा केली आहे. ज्याअंतर्गत, गुंतवणुकीसाठी सोन्याची नाणी देशातीलच टांकसाळीत तयार केली जाणार आहेत. सरकारनेच ही नाणी बनविण्यास सुरुवात केल्यास परकीय चलन वाचेल आणि ग्राहकांनाही फायदा होईल. ही नाणी तुलनेने कमी किमतीत खरेदी करता येतील. विशेष म्हणजे देशातीलच सोन्यातून तयार करण्यात आलेल्या नाण्यांवर अशोक चक्र कोरण्यात येईल.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20983

Posted by on Mar 1 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1996 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२८ फेब्रुवारी] - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याचे सत्र सुरूच राहिल्याने, त्याचा फटका आज शनिवारी देशवासीयांना ...

×