Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » सुषमा स्वराज यांचे बीजिंगमध्ये आगमन

सुषमा स्वराज यांचे बीजिंगमध्ये आगमन

=चार दिवसांचा दौरा प्रारंभ=
sushma-swaraj---story_650बीजिंग, [३१ जानेवारी] – परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचे आज शनिवारी सायंकाळी चीनच्या चार दिवसांच्या भेटीवर येथे आगमन झाले. या भेटीच्या काळात त्या चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार असून, चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांसोबतही द्विपक्षीय, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्यांवर चर्चा करणार आहेत. सोबतच त्या रशिया-भारत-चीनचा समावेश असलेल्या त्रिपक्षीय बैठकीतही सहभागी होणार आहेत.
गेल्या वर्षी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची सूत्रे स्वीकारल्यानंतर स्वराज यांचा हा पहिलाच चीन दौरा राहणार आहे. कैलाश मानसरोवर यात्रेचा दुसरा मार्ग तिबेटमधून सुरू करण्याच्या अंतिम व्यवस्थेवरही त्यांच्या भेटीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. भारतीय यात्रेकरूंकरिता हा मार्ग सुरू करण्याची तयारी चीनने गेल्या वर्षीच दर्शविली होती.
स्वराज यांच्यासोबत नवनियुक्त परराष्ट्र सचिव एस. जयशंकर आणि मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकारीही येथे आले आहेत. सुजाता सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर जयशंकर यांची दोन दिवसांपूर्वीच या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर नियुक्त झाल्यानंतर त्यांचाही हा पहिलाच विदेश दौरा राहणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20206

Posted by on Feb 2 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (2143 of 2458 articles)


=शशी थरूर यांची स्तुतिसुमने= नवी दिल्ली, [१ फेब्रुवारी] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपात केंद्रात ‘मास्टर कम्युनिकेटर’ आला असल्याचे आज ...

×