Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सुषमा स्वराज रूग्णालयात

सुषमा स्वराज रूग्णालयात

sushma-swaraj_650x400_81434283885नवी दिल्ली, [२६ एप्रिल] – परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना छातीत दुखू लागल्याने व श्‍वसनाचा त्रास होत असल्यामुळे सोमवारी रात्री रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीतील ‘एम्स’ रूग्णालयात स्वराज यांना सोमवारी रात्री दहा वाजता दाखल करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून ६४ वर्षीय स्वराज यांना मधुमेहाचा त्रास आहे. सोमवारी सकाळपासूनच त्यांच्या छातीत दुखत होते, मात्र संध्याकाळच्या सुमारास त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले आहे. स्वराज यांच्या काही चाचण्याही करण्यात आल्या असून त्याचा अहवाल अजून आला नाही, असे एम्सच्या अधिकार्‍याने सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27992

Posted by on Apr 26 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (439 of 2453 articles)


=राज्यसभा दिवसभरासाठी स्थगित •, लोकसभेत कॉंग्रेसच्या सदस्यांची घोषणबाजी= नवी दिल्ली, [२५ एप्रिल] - उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मुद्यावरून संसदेच्या ...

×