Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » सुषमा स्वराज शनिवारपासून चीन दौर्‍यावर

सुषमा स्वराज शनिवारपासून चीन दौर्‍यावर

=रशिया-भारत-चीन त्रिपक्षीय बैठकीत सहभागी होणार=
Sushma-Swaraj2नवी दिल्ली, [२८ जानेवारी] – परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज येत्या शनिवारी चीनच्या चार दिवसांच्या भेटीवर रवाना होणार आहेत. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेण्यासोबतच, त्या रशिया-भारत-चीन त्रिपक्षीय बैठकीत तसेच भारत-चीन मीडिया फोरमच्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीवर चीनच्या शासकीय वृत्तपत्रांनी सडकून टीका केली होती. याच पाश्‍वभूमीवर होत असलेल्या सुषमा स्वराज यांच्या चीन दौर्‍याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. वॉंग यी यांच्यासोबत त्या द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर सविस्तर चर्चा करणार आहेत, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
याच वर्षीच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला भेट देण्याची शक्यता आहे. या भेटीची रूपरेषाही स्वराज यांच्या दौर्‍यात निश्‍चित केली जाऊ शकते. गेल्या वर्षी मे महिन्यात भारतात नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि परराष्ट्र मंत्री वांग यांनी भारताला भेट दिली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20143

Posted by on Jan 29 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (2155 of 2453 articles)


=रामविलास पासवान यांची माहिती= पाटणा, [२८ जानेवारी] - रालोआतील मुख्य घटक असलेला भाजपा हा आम्हाला मोठ्या भावासारखा आहे आणि बिहारमध्ये ...

×