Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » सूडाचे राजकारण करणार नाही

सूडाचे राजकारण करणार नाही

=विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले=
devendra-fadnavis9मुंबई, [१५ मार्च] – आम्ही सूडाचे राजकारण करणार नाही. पण घोटाळ्याचे पुरावे असतील, तर कुणालाही सोडणार नाही, अशा कडक शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना फटकारले. घोटाळे दाबण्यासाठी मदत करणार नाही आणि त्यासाठी या सभागृहाचा वापर देखील करू देणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सुनावले.
माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडीने सोमवारी अटक केल्याचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. विरोधकांनी गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला. विरोधकांच्या गोंधळामुळे चार वेळा विधानसभेचे कामकाज तहकुब करण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. ईडी ही स्वायत्त संस्था आहे. या संस्थेने गेल्या काही महिन्यांपासून मनी लॉण्डरिंग प्रकरणाचा तपास करून माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक केली. त्याचप्रमाणे सोमवारी छगन भुजबळ यांनाही अटक केली. परंतु तपास यंत्रणेला पुरावे मिळाल्याने त्यांनी कारवाई केली असताना या सभागृहाचा वापर करून तपास यंत्रणेवर दबाव आणणे योग्य नसल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच तपास यंत्रणेवर दबाव टाकण्यासाठी सभागृहाचा वापर होऊ देऊ नका, ते योग्य होणार नाही, असेही ते म्हणाले.
ईडीने मूग गिळून गप्प बसावे काय?
भ्रष्टाचार झाला असेल आणि घोटाळ्याचे पुरावे असतील, तरी ईडीने मूग गिळून गप्प बसावे काय? घोटाळे होत असताना ईडीने हातावर हात ठेवून शांत बसावे की, कायदेशीर कारवाई करावी, असा सवाल फडणवीस यांनी विरोधकांना केला. या कारवाईला विरोधक राजकीय कारवाई म्हणत असले, तरी राज्यासमोर शेतकरी, दुष्काळ आणि पाणी टंचाई आदी प्रश्‍न असताना विरोधक कोणत्या प्रश्‍नाला प्राधान्य देत आहेत. यावरून लोकांना सारे काही कळले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
सूडाचे राजकारण भुजबळांनी केले : अतुल भातखळकर
सूडाचे राजकाराण करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जात असताना, भाजपा सदस्य अतुल भातखळकर यांनी सूडाचे राजकारण आम्ही नाही, तर छगन भुजबळांनी स्वत: गृहमंत्री असताना केले. श्रीकृष्ण आयोगामधील एक दोन उल्लेखांचा आपल्यापरीने अर्थ लावत, हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर खोटा गुन्हा दाखल केला. केवळ एका दिवसात बाळासाहेबांना न्यायालयाने सोडले. एवढेच नव्हे तर, या प्रकरणाचा आदेश देताना न्यायालयाने कठोर ताशेरे कारवाई करणार्‍या यंत्रणेवर ओढले आहेत असे सांगत, भातखळकर म्हणाले की, ईडी ही यंत्रणा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. राज्य सरकारचा थेट संबध नाही. त्यामुळे राज्याच्या या सर्वभौम सभागृहात अशापद्धतीने गोंधळ घालणे आणि आरोप लावणे चुकीचे आहे. तिकडे संसदेचेही अधिवेशन सुरू असून, तिथे त्यांचे सदस्य असताना आणि तपास यंत्रणा केंद्राच्या अखत्यारीत असताना संसदेचे कामकाज सुरळीतपणे सुरू आहे आणि ज्याचा या घटनेशी संबध नाही, तेथील सभागृहाचा वेळ वाया घालवला जात आहे, अशा शब्दात भुजबळांच्या अटकेवरून वारंवार सभागृहात गोंधळ घालणार्‍या विरोधकांना भातखळकरांनी सुनावले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27348

Posted by on Mar 16 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (649 of 2451 articles)


नवी दिल्ली, [१५ मार्च] - तासन्‌तास आपल्या जवळच्या व्यक्तींशी मोबाईलवर गप्पा मारणार्‍यांना यापुढे त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. दि ...

×