Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » सू की यांचा चालक अध्यक्षपदासाठी नामांकित

सू की यांचा चालक अध्यक्षपदासाठी नामांकित

Aung San Suu Kyiनेपीदाव, [१० मार्च] – म्यानमारमधील लोकशाहीवादी नेत्या आँग सॅन सू की यांच्या पक्षाने की यांचा निकटचा सहकारी व माजी चालकाला म्यानमारच्या पुढच्या अध्यक्षपदासाठी नामांकित केले आहे.
६९ वर्षीय हतिन क्याव असे, सू की यांच्या पक्षाने अध्यक्षपदासाठी नामांकित केलेल्या उमेदवाराचे नाव आहे. क्याव सू की यांच्यासोबत शाळेत शिकले असून, सध्या चॅरिटेबल फाऊंडेशनच्या संचालनात त्यांना मदत करत आहेत. याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून तर्कवितर्क करण्यात येत होते आणि क्याव यांच्या नामांकनामुळे याबाबतच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
म्यानमारच्या लष्कराने तयार केलेल्या घटनेनुसार सू की यांना या सर्वोच्च पदावर विराजमान होता येत नाही. परंतु, आता त्यांनी असा उमेदवार देऊन या मार्गाने सत्ता गाजविण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकीत लाखो मतदारांनी सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसीच्या बाजूने मतदान केले होते. या मतदारांच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्याचे आव्हान सू की यांना आता पेलावे लागणार आहे.
मोठ्या अपेक्षा ठेवून पाठिंबा देणार्‍या मतदारांच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले हे मोठे पाऊल आहे, असे सू की यांनी पक्षाच्या वेबसाईटवर प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले असून, पक्षाच्या ध्येयासाठी शांतपणे पाठिंबा द्या, असे आवाहन केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27201

Posted by on Mar 10 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (710 of 2458 articles)


=अनेक विमाने रद्द, दुबईत २५७ रस्ते अपघात= दुबई, [१० मार्च] - सगळीकडे वाळवंट, प्रचंड उकाडा आणि कधीकाळीच पडणार्‍या पावसाने बुधवारी ...

×