Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » सैतान सुधारेल, पण पाक नाही

सैतान सुधारेल, पण पाक नाही

=योगी आदित्यनाथ यांचे प्रतिपादन=
yogi adityanath 3गोरखपूर, [३ जानेवारी] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व कटुता बाजूला सारून अलीकडेच लाहोरचा आश्‍चर्यकारक दौरा केला. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, हाच त्यामागील उद्देश होता. पण, पाकने आपला खरा चेहरा दाखविला. एकवेळ सैतान सुधारू शकतो, मात्र पाकिस्तान कधीच सुधरणार नाही, अशी परखड भूमिका भाजपाचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी आज रविवारी येथे विशद केली.
भारताने शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी पाकिस्तान भारताविरोधात छुप्या युद्धाचे धोरण कधीच सोडणार नाही. नरेंद्र मोदी यांच्या शांतीच्या संदेशाचा अपमान करून पाकने पंजाबच्या पठाणकोट येथे मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणला. पाकमध्ये लोकनियुक्त सरकार अस्तित्वातच नाही. या देशात तर आयएसआय आणि दहशतवाद्यांचेच सरकार आहे, अशी टीकाही आदित्यनाथ यांनी केली.
पाकसोबत चांगले संबंध ठेवण्यासाठी भारताने कायमच प्रयत्न केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या लाहोर भेटीतूनही ही बाब दिसून आली. पाक मात्र प्रत्येक वेळी भारताचा विश्‍वासघात करीत असतो. आम्ही दहशतवादी धोरण कधीच सोडणार नाही, हेच पाक वारंवार आपल्या कृतीतून स्पष्ट करीत असतो. या वागण्यामुळेच आज संपूर्ण जग पाकचा तिरस्कार करीत आहे, असे आदित्यनाथ म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26401

Posted by on Jan 4 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (943 of 2453 articles)


नवी दिल्ली, [३ जानेवारी] - कामगारांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणारे भाकपाचे ज्येष्ठ नेते ए. बी. उर्फ भाई बर्धन यांच्या पार्थिवावर उद्या ...

×